नवी दिल्ली, 28 मे: केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी गुरुवारी चार धाम (Char Dham Yatra) प्रकल्पासाठी शेवटच्या टप्प्यापर्यंत जोडण्यात येणाऱ्या कनेक्टिव्हिटी योजनांचे सर्वेक्षण केले. चार धाम म्हणजेच यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ याठिकाणाहून नवीन बीजी रेल्वे कनेक्टिव्हिटीसाठीचे अंतिम सर्वेक्षण लवकरच पूर्णत्वास येणार आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी या प्रकल्पाचा आढावा घेणाऱ्या बैठकीत रेल्वे मंत्र्यांना याबाबत माहिती दिली आहे. रेल्वे मंत्र्यांनी या योजनेची घोषणा गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये केली होती. या बैठकीदरम्यान रेल्वे मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रवाशांची सुरक्षा आणि आरामाच्या दृष्टीने सर्व पर्यायांबाबत सविस्तर आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी असे म्हटले आहे की शेवटच्या टप्प्यापर्यंत कनेक्टिव्हिटीचे सर्व पर्याय तपासले पाहिजेत आणि प्रकल्प पूर्ण होईपर्यंत संपूर्ण खर्चाच्या परिणामाचीही तपासणी केली पाहिजे. गोयल म्हणाले की, चार धाम यात्रेसाठी यात्रेकरूंना त्वरित, सुरक्षित आणि सोयीस्कर कनेक्टिव्हिटी मिळवावी. मनीकंट्रोलने याबाबत वृत्त दिले आहे. हे वाचा- Post Office मध्येही सुरक्षा विमा; 50 लाखांपर्यंत कव्हरेज आणि कर्जाची सुविधा रेल्वे मंत्र्यांच्या मते, केदारनाथ आणि बद्रीनाथ रेल्वे कनेक्टिव्हिटी कर्णप्रयाग स्टेशनमधून सुरू होईल. हा मार्ग 125 किमी लांब असून ऋषिकेश-कर्णप्रयाग या नव्या बीजी रेल्वेलाइन प्रोजेक्टचा भाग आहे. तर गंगोत्री आणि यमनोत्री रेल्वे कनेक्टिव्हिटी सध्याच्या डोईवाला (Doiwala) स्टेशनवरून सुरू होईल. हे वाचा- LPG गॅस बुकिंगबाबतचे नियम बदलणार, सिलेंडर रिफिल करणं होईल अधिक सोपं रेल्वेच्या (Indian Railway) माहितीनुसार चार धाम यात्रेसाठी सध्या Reconnaissance Engineering Survey (RES) सर्व्हे सुरू आहे. ज्यामध्ये भाविकांना चारही धामांपर्यंत सुरक्षित आणि आरामदायक पद्धतीने पोहचण्यात यावं असं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. भारतीय रेल्वे 327 किलोमीटर रेल्वे मार्गाअंतर्गत उत्तराखंडमध्ये चारही धामांना जोडण्यासाठी एका बहुप्रतिक्षित प्रोजेक्टवर काम करत आहे. यामुळे भाविकांची चार धाम यात्रा अधिक सोपी होणार आहे.