JOIN US
मराठी बातम्या / देश / प्रेमाचा दुःखद अंत! प्रेयसीच्या आत्महत्येची माहिती मिळताच प्रियकरानेही ट्रेनसमोर मारली उडी

प्रेमाचा दुःखद अंत! प्रेयसीच्या आत्महत्येची माहिती मिळताच प्रियकरानेही ट्रेनसमोर मारली उडी

उत्तर प्रदेशातल्या बरेली जिल्ह्यात एक धक्कादायक (Bareilly Latest News) घटना घडली आहे. तिथे एका प्रेमी युगलाने धावत्या ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. अल्पवयीन प्रेयसीने (Teenage Suicide) आधी आत्महत्या केली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बरेली, 25 फेब्रुवारी: उत्तर प्रदेशातल्या बरेली जिल्ह्यात एक धक्कादायक (Bareilly Latest News) घटना घडली आहे. तिथे एका प्रेमी युगलाने धावत्या ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. अल्पवयीन प्रेयसीने (Teenage Suicide) आधी आत्महत्या केली. तिच्या मृत्यूची बातमी समजताच 18 वर्षीय तरुणाने ट्रेनसमोर उडी मारून जीवन संपवलं. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळ गाठून प्रेमी युगलाचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी रुग्णालयात पाठवला. गावकऱ्यांच्या टोमण्यांना हे प्रेमी युगुल वैतागलं असल्याचं बोललं जात आहे. गावकऱ्यांच्या वागण्यामुळे दोघेही तणावात राहू लागले होते. शेवटी कंटाळून त्यांनी हे भयानक पाऊल उचलल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमी युगलाने आत्महत्या केल्याची घटना फतेहगंज पूर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या तिसुआ क्रॉसिंगला घडली. प्रेमी युगलाच्या मृत्यूची बातमी समजताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांचेही मृतदेह रेल्वे रुळावरून उचलून पोस्टमॉर्टेमसाठी रुग्णालयात पाठवले. आत्महत्या केलेलं प्रेमी युगुल शाहजहानपूर जिल्ह्यातलं रहिवासी आहे. एकाच गावात राहणाऱ्या या दोघांचं प्रेम गावकऱ्यांना मान्य नव्हते. या दोघांना गावकरी टोमणे मारायचे आणि त्रास द्यायचे, असं म्हटलं जातंय. या त्रासाला कंटाळून दोघांनी रेल्वेसमोर उडी मारून आपले जीवन संपवलं. हे वाचा- युक्रेनमधल्या भारतीयांचं लवकरच Airlift..! केंद्र सरकार राबवणार स्पेशल ऑपरेशन एकाच गावचे होते दोघंही शाहजहानपूरच्या कटरा पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या 18 वर्षीय तरुणाचे गावातल्या 16 वर्षीय तरुणीशी प्रेमसंबंध होते. कटरा पोलीस स्टेशन परिसरात शुक्रवारी (25 फेब्रुवारी) सकाळी तरुणाने ट्रेनसमोर उडी घेऊन आपला जीव दिला. प्रेयसीच्या आत्महत्येची माहिती समजल्यानंतर त्याने हे पाऊल उचललं, असं म्हटलं जातंय. फतेहगंज पूर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तिसुआजवळ तरुणाने रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, तरुणी सकाळी शौचासाठी घराबाहेर पडली होती; मात्र नंतर तिचा मृतदेह रेल्वे रुळावर सापडला. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह रेल्वे रुळावरून बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली. हे वाचा- जिच्यावर जिवापाड प्रेम केलं तिचाच केला खेळ खल्लास, लव्ह स्टोरीचा भयावह शेवट पोलिसांनी काय सांगितलं? एसएसपी रोहित सिंह सजवान यांनी सांगितलं, की तरुण आणि तरुणीचे मृतदेह रेल्वे रुळावर पडले असल्याची माहिती फतेहगंज पूर्व पोलीस स्टेशनला मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. मृत तरुण आणि तरुणी, दोघंही एकाच गावातले रहिवासी आहेत. तरुणीचा मृतदेह शाहजहानपूर परिसरात, तर तरुणाचा मृतदेह बरेली परिसरात सापडला आहे. आता कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीच्या आधारे कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या