नवी दिल्ली, 30 मे : अॅलोपॅथी (allopathy) संदर्भात दिलेल्या वक्तव्यावरून बाबा रामदेव (Baba Ramdev) चोहोबाजुंनी अडकले आहेत. या मुद्द्यावर न्यूज 18 ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी म्हटले की, एका व्यक्तीच्या मृत्यूचा मुद्दा बनवला जात आहे. मात्र दुसरीकडे लसींचे डोन डोस घेऊनही अनेक डॉक्टर मरण पावले. हा वाद मिटवण्याची मनापासून इच्छा असल्याचंही बाबा रामदेव म्हणाले. अनावश्यक वादापेक्षा देशाच्या भल्यासाटी सर्वांनी एकत्र यायला हवं असंही बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे. (IMA vs Baba Ramdev) (वाचा- 1 जूनपासून पुण्यातील निर्बंध शिथिल करणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले… ) त्याचवेळी त्यांनी त्यांच्या 90 टक्के कोरोना रुग्ण योग आयुर्वेदाच्या मदतीने ठीक झाल्याचा पुनरुच्चार केला. तसंच बीपी, शुगर, अस्थमा, आर्थरायटिस अशा रुग्णांना आयुर्वेदाद्वारे पूर्ण बरे करण्याचं आव्हान स्वीकारण्याची तयारीही रामदेव बाबांनी दाखवली. मी देशाचं 100 कोटी किलो वजन कमी केलं आहे. बीपी शुगर अस्थमा आर्थरायटीस यासह अनेक आजारांवर उपचार करण्याचा माझा दावा आहे. कोरोनातून देशाला वाचवण्यात डॉक्टरांचं मोठं काम आहे, हे मी मान्य केलं आहे, पण तसं असलं तरी 90 टक्के रुग्ण बरे करणाऱ्या आयुर्वेदाला कमी लेखण्याचं काम करू नये असं बाबा रामदेव म्हणाले.
(वाचा- मटण खा, म्हणणाऱ्या आमदारांनी स्वतः शर्ट काढून रस्त्यावर पडलेलं झाड केलं बाजुला ) कोरोना रुग्णांची जबाबदारी बाबा रामदेव यांनी घ्यावी असं आव्हान आयएमएनं दिलं होतं. त्यावर व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवरील रुग्णांना डॉक्टरांनी सांभाळावं इतर सर्वांच्या उपचाराची मी जबाबदारी घेतो असा दावा रामदेव बाबांनी केला. 90 टक्के रुग्ण प्राणायाम करून बरे झाल्याचा पुनरुच्चान त्यांनी केला. यावेळी त्यांनी सर्जरीवरील वक्तव्यावर ठाम असल्याचं म्हटलं. सर्जरी हे सायन्स नसून स्किल आहे. आम्ही पतंजलीमध्येही सर्जरी करतो, असं बाबा रामदेव म्हणाले. मी सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना नमन करतो. त्यांना कमी लेखत नाही. मात्र प्रत्येकवेळी आयुर्वेदाला कमी लेखलं जातं, असं बाबा रामदेव म्हणाले. आयएमए पूर्ण मेडिकल सायन्सचे प्रतिनिधित्व करत नाही. ती इंग्रजांनी बनवलेली संघटना असल्याची टीकाही त्यांनी केली.
रामदेव बाबांनी अॅलोपॅथी संदर्भात दिलेल्या वक्तव्यावरून IMA ने त्यांच्यावर 1000 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा केला आहे. याबाबत न्यूज 18 च्या विशेष मुलाखतीत बोलताना बाबा रामदेव यांनी हा वाद संपवण्याची मनापासून इच्छा असल्याचं म्हटलं आहे. ही वेळ स्वार्थ सोडून लोकांचा विचार करण्याची आहे. उपचारासाठी लाखो रुपये खर्च करण्याची ऐपत नसणाऱ्यांबाबत विचार करावा असंही बाबा रामदेव म्हणाले. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्यासाठी रामदेव बाबांनी माफी मागत असल्याचं म्हटलं आहे.