JOIN US
मराठी बातम्या / देश / प्रॉपर्टीसाठी बायकोला फसवलं; खोटी पत्नी, खोटं आधारकार्ड वापरून प्रॉपर्टी लाटायचा प्रयत्न

प्रॉपर्टीसाठी बायकोला फसवलं; खोटी पत्नी, खोटं आधारकार्ड वापरून प्रॉपर्टी लाटायचा प्रयत्न

आशिषने केलेली फसवणूक, अनियमितता समोर आल्यावर आधार कार्डनुसार ती महिला अन्य कुणी असल्याचं सिद्ध होत आहे, असं कोर्टानं 24 जून रोजी सांगितलं तसंच आशिषविरुद्ध चौकशी करण्याचेही आदेश कोर्टानं दिले.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अहमदाबाद, 3 ऑगस्ट: प्रॉपर्टीसाठी काहीवेळेस माणसं कोणत्याही थराला जातात. नातेवाईक, कुटुंबीयांची फसवणूक केली जाते. अशाच प्रकारच्या फसवणुकीचा एक प्रकार अहमदाबादमध्ये समोर आला आहे. मणिनगर (Maninagar) इथला रहिवासी आशिष देसाई यानं आपली आधीची पत्नी म्हणून दुसऱ्याच एका बाईला सबरजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये उभं केलं. इतकंच नाही तर तिचं खोटं आधारकार्डही (Fake Aadhar card) सादर केलं आणि मालमत्तेतील दोघांच्या वाट्यातील तिच्या नावे असलेला 50% भागही लाटण्याचा प्रयत्न केला. 2018 मधलं हे प्रकरण आहे. याबद्दल टाईम्स ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर वृत्त देण्यात आलं आहे. वाजेपूर इथल्या रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये (Register Office) ही बनावट पत्नी आणि तिचं बनावट आधारकार्ड सादर करण्यात आलं होतं. त्यानंतर करंज पोलीस ठाण्यात मंगळवारी FIR दाखल करण्यात आली. आशिष देसाई यानं 9 सप्टेंबर 2018 रोजी एका महिलेला सब रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये आणलं. ती महिला आपली पत्नी असल्याचं आशिष यानं सांगितलं. तिचं आधार कार्डही त्यानं सादर केलं. तसंच प्रल्हादनगरमधील सुरधारा सोसायटीतील घरातील तिचा 50% वाटा ती स्वत:हून सोडत असल्याचं त्यानं सांगितलं, अशी माहिती सब रजिस्ट्रार इनचार्ज महेंद्र पटेल यांनी दिली. Solar Storm: पृथ्वीवर आज सौर वादळ धडकणार? वीज, मोबाईल नेटवर्क ठप्प होण्याची शक्यता

मात्र जेव्हा आशिषची आधीची पत्नी सेजल देसाई हिनं तिच्या वकीलांमार्फत गुजरात हायकोर्टात आशिषने बनावट कागदपत्रं (Fake Documents) सादर केल्याचं आणि आपल्याला प्रॉपर्टीच्या अधिकारातून डावलल्याबाबत कागदपत्रं सादर केली, तेव्हा हे सगळं प्रकरण उजेडात आलं.

सेजलनं तिचं आधारकार्ड वलसाडमध्ये बनवून घेतल्याचं आणि आपलं कोणतंही दुसरं आधारकार्ड नसल्याचं प्रतिज्ञापत्रात म्हटलं. दुसरं आधारकार्ड बनवण्याची कायद्याने परवानगी नाही, असंही तिनं प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केलं. ज्या महिलेला आशिषनं त्याची आधीची पत्नी म्हणून सब रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये नेलं होतं. तिचा चेहरा तिथल्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ते फूटेज पाहून तसंच तिचं आधारकार्ड बघून ती महिला अन्य कोणी असल्याचं सिद्ध होत आहे, असं सेजलनं सांगितलं. रेल्वे कर्मचारी स्वत:च्या कारने ड्युटीवर आल्याने वरिष्ठांकडून नोटीस, रेल्वेचा नियम काय आहे? सेजल आणि आशिष 2016 मध्ये वेगळे झाले. त्यावेळेस त्यांच्या दोन मुलांचा ताबा सेजलकडे देण्यात आला. वलसाडच्या स्थानिक कोर्टाने आशिषला त्याच्या पत्नीला 20 लाख रुपयांची पोटगी देण्याचे आणि त्यांच्या दोन मुलांना प्रत्येकी 15 लाख रुपये देण्याचे आदेश दिले होते. आशिषने केलेली फसवणूक, अनियमितता समोर आल्यावर आधार कार्डनुसार ती महिला अन्य कुणी असल्याचं सिद्ध होत आहे, असं कोर्टानं 24 जून रोजी सांगितलं तसंच आशिषविरुद्ध चौकशी करण्याचेही आदेश कोर्टानं दिले. त्यानंतर करंज पोलिसांनी आशिषच्या विरोधात फसवणूक, बनावट कागदपत्रांचा वापर आणि ती सादर करणं याबद्दल FIR नोंदवला. खोटेपणानं आपल्याच पूर्वाश्रमीच्या पत्नीला फसवण्याचा प्रयत्न केलेल्या आशिषचा खोटेपणा अखेर समोर आला. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या