JOIN US
मराठी बातम्या / देश / ATF Price Drops : महागाईमधून मिळणार दिलासा, विमान प्रवास होणार स्वस्त!

ATF Price Drops : महागाईमधून मिळणार दिलासा, विमान प्रवास होणार स्वस्त!

इंधन दरात वाढ झाल्याने अलीकडच्या काळात सर्वत्र प्रवास भाडे वाढले होते. या महागाईत दिलासा मिळण्याची (ATF Price Drops) चिन्हं आहेत.

जाहिरात

एअर इंडिया टाटा समूहात येताच या कंपनीचे दिवस बदलले. एअर इंडिया आता दिवसेंदिवस चांगली सेवा देऊन ग्राहकांमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहे

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 जुलै :  इंधन दरात वाढ झाल्याने अलीकडच्या काळात सर्वत्र प्रवास भाडे वाढले होते. हवाई वाहतुकीलाही याचा फटका बसला. परंतु कच्च्या तेलाच्या (Crude oil) दरात घसरण झाल्याने तेल कंपन्यांनी हवाई इंधन दरात (Air Turbine Fuel) कपात केल्याने ते आता 2.2 टक्क्यांनी स्वस्त झाले आहे. परिणामी विमान प्रवास स्वस्त होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. इंधनाचे दर प्रचंड वाढत असताना विविध राज्यातील सरकारकडून कर कपात (Tax Deduction) केली जात आहे. अशा स्थितीत तेल कंपन्यांकडूनही एटीएफमध्ये कपात केली गेल्याने विमान प्रवाशांना दिलासा देणारी बातमी मिळू शकते. ‘टीव्ही नाइन हिंदी’ने या संदर्भात वृत्त दिले आहे. तेल कंपन्यांच्या वतीने एटीएफच्या दरात प्रति किलोलिटर मागे 3084.94 रुपयांनी दर घटवले आहेत. दरात कपात झाल्यानंतर सध्या जेट फ्यूएलचे (Jet Fuel) दर 138,147.90 रुपये प्रती किलोलिटर झाले आहे. दिल्लीत आता एटीएफ 138,147.95 रुपये प्रति किलोलिटर आणि मुंबईमध्ये 137,095.74 रुपये प्रती किलोलिटरवर पोहोचले आहे. लॉगिन पासवर्ड विसरल्यामुळं Income Tax Return भरता येईना? आधारच्या मदतीने असा करा रिसेट मागील आठवड्यातच एटीएफ कपातीबाबत मंत्र्यांशी केली चर्चा हवाई इंधन दरामध्ये कपात करण्याबाबत मागील अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. मागील आठवड्यात नागरी हवाई वाहतुकीशी संबंधित क्षेत्रातील काही जणांनी एटीएफच्या कपातीबाबत नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांशी चर्चा केली होती. तर एटीएफमध्ये दिलासा मिळावा म्हणून या आठवड्यातही एअरलाइन्सने तेल कंपन्यांसोबत बैठक केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. सध्या एटीएफमध्ये झालेली कपात अपेक्षेपेक्षा कमी असली तरी एकूण खर्चात एटीएफचा हिस्सा जास्त असल्याने इंधनातील कपातीचा फायदा एअरलाइनला मिळणार आहे. यापूर्वी एटीएफच्या किमतीत 16 टक्के वाढ नोंदवली गेली होती. त्यामुळे याचे दर विक्रमी स्तरावर पोहोचले होते. शनिवारी झालेल्या इंधर दर कपाती अगोदर शुक्रवारपर्यंत एटीएफचे दर 91 टक्क्यांपर्यंत वाढले होते. 2022 मध्ये हे दर आतापर्यंतचे सर्वाधिक दर होते. World Expensive share : एक शेअर 3.33 कोटींना; कंपनीची Paytmमध्येही हिस्सेदारी इंधन दरात कपात झाली तर देशांतर्गत प्रवास सुकर होईल आणि इतर सर्व प्रकारे त्रास देत असलेल्या महागाईतूनही नागिरांना काही प्रमाणात दिलासा मिळेल अशी अपेक्षा वर्तवली जात आहे. हा प्रवास सोयीचा असल्याने लोक कायम हवाई प्रवासाला प्राधान्य देतात. याबाबतचा निर्णय लवकरच जाहीर होईल अशी अपेक्षा आहे. तसं झाल्यास प्रवाशांची सोय होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या