JOIN US
मराठी बातम्या / देश / 'कंडोमचा सर्वाधिक वापर मुस्लीमच करतात, पण तुम्ही...'; मोहन भागवतांच्या भाषणावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया

'कंडोमचा सर्वाधिक वापर मुस्लीमच करतात, पण तुम्ही...'; मोहन भागवतांच्या भाषणावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात लोकसंख्येचा मुद्दा उपस्थित केला होता. लोकसंख्येच्या असमतोलाचा मुद्दा दुर्लक्षित करू नये, असं ते म्हणाले होते. यावर ओवेसींनी प्रतिक्रिया दिली.

जाहिरात

फाईल फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 09 ऑक्टोबर : एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी भारतातील धार्मिक असमतोलावर प्रतिक्रिया दिली आहे. मुस्लिमांची लोकसंख्या वाढत नसून कमी होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. विजयादशमीच्या मुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात लोकसंख्येचा मुद्दा उपस्थित केला होता. लोकसंख्येच्या असमतोलाचा मुद्दा दुर्लक्षित करू नये, असं ते म्हणाले होते. यावर ओवेसींनी प्रतिक्रिया दिली. ‘लोकशाहीचा मुडदा पाडून केलेली मॅचफिक्सिंग’, निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सामनातून प्रतिक्रिया एका जाहीर सभेत ओवेसी म्हणाले, ‘मुस्लिमांची लोकसंख्या वाढत नाहीये. स्वतःला अनावश्यक तणावात ठेवू नका. आपली लोकसंख्या कमी होत आहे. मुस्लिमांचा टीएफआर घसरत आहे….’. ते म्हणाले की, ‘दोन मुलांच्या मध्ये सर्वाधिक अंतर मुस्लिमांमध्येच ठेवलं जात आहे’. यावेळी त्यांनी सवाल केला की ‘कंडोम कोण जास्त वापरत आहे? आम्ही वापरत आहोत. मात्र, मोहन भागवत यावर बोलणार नाहीत, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या

मोहन भागवत काय म्हणाले होते ? भागवत यांनी भाषणादरम्यान लोकसंख्येच्या असमतोलावर चर्चा केली होती. ते म्हणाले होते की, ‘लोकसंख्या असंतुलनावर लक्ष ठेवणे हे राष्ट्रहिताचे आहे. धर्मआधारित असमतोल आणि सक्तीचे धर्मातर यामुळे देशाचे तुकडे होण्याची भीती आहे. पूर्व तिमोर, कोसोवो आणि दक्षिण सुदान ही राष्ट्रे धार्मिक समुदायावर आधारित असमतोलामुळे उदयास आल्याचे त्यांनी सांगितले..’ Shivsena VS Shinde : आमचे चिन्ह…, उद्धव ठाकरेंच्या खास माणसाने नाव आणि फोटो केला जाहीर पुढे ते म्हणाले होते की ‘लोकसंख्या नियंत्रणासाठी नवीन धोरण आखण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. भारतात लोकसंख्या नियंत्रणाचे नवीन धोरण हवे आणि ते सर्वासाठी लागू असावे. त्यातून कुणालाही सुट मिळू नये’. मोहन भागवत यांच्या याच भाषणावर प्रतिक्रिया देताना असदुद्दीन ओवेसी यांनी ही टीका केली आहे,

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या