JOIN US
मराठी बातम्या / देश / CCTV VIDEO: बॅडमिंटन खेळताना आला हृदयविकाराचा झटका, पोलिसाचा जागीच मृत्यू

CCTV VIDEO: बॅडमिंटन खेळताना आला हृदयविकाराचा झटका, पोलिसाचा जागीच मृत्यू

आंध्रप्रदेशमधून एक विचलित करणारी बातमी समोर आली आहे. बॅडमिंटन खेळताना हृदयविकाराचा झटका आल्याने एका पोलीस इन्स्पेक्टरचा मृत्यू झाला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पश्चिम गोदावरी, 24 मार्च: आंध्रप्रदेशमधून एक विचलित करणारी बातमी समोर आली आहे. बॅडमिंटन खेळताना हृदयविकाराचा झटका आल्याने एका पोलीस इन्स्पेक्टरचा मृत्यू झाला आहे. यावेळी त्यांच्या साथीदारांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण त्यात यश आलं आहे. या घटनेचा एक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. गण प्रसाद पोलीस ठाण्यामध्ये भगवान प्रसाद तैनात होते. सीसीटीव्हीतील दृश्यात आपण पाहू शकतो की काही वेळासाठी भगवान यांच्या हालचारी बदलल्या होत्या. त्यानंतर ते धाडकन जमिनीवर कोसळले. इतर सहकाऱ्यांनी त्यांना वाचवण्याचा देखील प्रयत्न केला पण तोपर्यंत उशीर झाला होता.

सोशल मीडियावर हा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल (Video Viral on Social Media) होत आहे. प्रसाद यांच्याबरोबर अशी दुर्देवी घटना घडल्याने परिसरात दु:खाचं वातावरण आहे. भगवान प्रसाद 45 वर्षांचे होते. व्हिडीओमध्ये दिसत असल्यानुसार प्रसाद सुरुवातीला खेळत होते. खेळता खेळता ते खाली वाकले आणि धाडकन जमिनीवर कोसळले. ही घटना त्यांच्या सहकाऱ्यांसाठी देखील अत्यंत धक्कादायक होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या