JOIN US
मराठी बातम्या / देश / 'मी पद्म पुरस्कारासाठी अपात्र...' पद्म भूषण Anand Mahindra यांच्या या ट्वीटने पुन्हा जिंकलं मन

'मी पद्म पुरस्कारासाठी अपात्र...' पद्म भूषण Anand Mahindra यांच्या या ट्वीटने पुन्हा जिंकलं मन

भारत सरकारकडून आनंद महिंद्रा यांचा देशातील तिसरा मोठा नागरी पुरस्कार (India’s third-highest civilian honor) असणाऱ्या पद्म भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. याबाबत त्यांनी केलेल्या ट्वीटने पुन्हा एकदा सर्वांची मनं जिंकून घेतली आहेत.

जाहिरात

President Kovind presents Padma Bhushan to Shri Anand Gopal Mahindra for Trade and Industry

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 नोव्हेंबर: देशातील दिग्गज उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर (Anand Mahindra Twitter) वर विशेष सक्रीय आहेत. ते देशभरातील विविध व्हिडीओ, फोटो त्यांच्या या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत असतात. त्यांच्या अनेक मजेदार पोस्टमुळे ते विशेष लोकप्रिय आहेत. ट्विटरवर आनंद महिंद्रा यांची तगडी फॅन फॉलोइंग देखील आहे. दरम्यान भारत सरकारकडून आनंद महिंद्रा यांचा देशातील तिसरा मोठा नागरी पुरस्कार (India’s third-highest civilian honor) असणाऱ्या पद्म भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. याबाबत त्यांनी केलेल्या ट्वीटने पुन्हा एकदा सर्वांची मनं जिंकून घेतली आहेत. ते स्वत: या पुरस्कारासाठी स्वत:ला अपात्र समजत असल्याचं ट्वीट त्यांनी केलं आहे. आनंद महिंद्रा यांनी यावर्षी पद्मश्री पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या पर्यावरणवादी तुलसी गौडा यांच्याबाबत गौरवोद्गार लिहिताना हे ट्वीट केले आहे. देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरील ट्वीट रीट्वीट करत त्यांनी असे म्हटले आहे की, ‘या सरकारने पद्म पुरस्कार प्राप्तकर्त्यांच्या रचनेत दीर्घकाळ प्रलंबित, परिवर्तनात्मक बदल केले आहेत. आता, तळागाळातील समाजाच्या सुधारणेसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींवर मुख्यत्वे लक्ष केंद्रित केले गेले आहे. मला खरोखरच त्यांच्या श्रेणींमध्ये येण्यास अपात्र वाटत आहे.’

यावेळी, तुलसी गौडा तसंच फळविक्रेते हरेकला हजब्बा यांसारख्या वंचित पार्श्वभूमीतील अनेक ‘रिअल लाइफ हिरों’ना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हजब्बा यांनी संत्रा विक्रीच्या व्यवसायातून कमावलेली जमापुंजी वापरली आणि कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील आपल्या गावात वंचित कुटुंबातील मुलांसाठी शाळा बांधली. त्यांच्या या कार्याचा भारत सरकारकडून सन्मान करण्यात आला आहे. पद्म पुरस्कार वितरण सोहळ्यात आनंद महिंद्रा यांचाही गौरव पद्म भूषण देऊन करण्यात आला. त्यांनी आणखी एका ट्वीटमध्ये त्यांना पाठिंबा देण्याऱ्यांचे आभार मानले आहेत.

पद्म पुरस्कार तीन श्रेणींमध्ये दिले जातात - पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री - दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ते जाहीर केले जातात. अपवादात्मक आणि विशिष्ट सेवेसाठी पद्मविभूषण, उच्च श्रेणीतील विशिष्ट सेवेसाठी पद्मभूषण आणि कोणत्याही क्षेत्रातील विशिष्ट सेवेसाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले जाते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या