फोटो - ANI
मुंबई, 20 जून : केंद्र सरकारनं सैन्यभरतीसाठी जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेच्या विरोधात (Agnipath Protest) काही संघटनांनी भारत बंदचे (Bharat Bandh) आज (सोमवार) आवाहन केले आहे. यापूर्वी या विरोधातील हिंसक आंदोलनामुळे सर्वाधिक प्रभावित ठरलेल्या बिहार आणि झारखंडमध्ये एक दिवसांचा बंद पुकारण्यात आला होता. त्यानंतर ही योजना रद्द होणार नसल्याचं तीन्ही सैन्य दलांनं स्पष्ट केले आहे. त्या पार्श्वभूमीवर हा बंद पुकारण्यात आला आहे. राजधानी दिल्लीला भारत बंदचा मोठा फटका बसला आहे. दिल्ली-गुरग्राम रस्त्यावर वाहतूकीची कोंडी झाली असून वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. दिल्ली पोलिसांकडून खबरदारीचा उपाय म्हणून प्रत्येक वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. दिल्लीतील जंतर-मंतरवर काँग्रेस आणि आम आदमी पक्ष या योजनेच्या विरोधात आंदोलन करणार आहेत.
शाळा बंद सोमवारी भारत बंदमुळे अनेक राज्यांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात येणार आहे. शालेय शिक्षण आणि साक्षरता सचिव राजेश शर्मा यांनी सांगितले की, काही संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर झारखंडमधील सर्व शाळा 20 जून रोजी बंद राहतील. खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. ‘अग्निपथ’च्या विरोधात हिंसक आंदोलन करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांनी उचललं हे पाऊल देशभरातील राज्य पोलिसांनी हिंसक आंदोलकांवर कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत एक हजाराहून अधिक लोकांना अटक करण्यात आली असून त्यापैकी बहुतांश बिहारमधील आहेत.