पंजाबमधील राजकीय घडामोडींनंतर राजस्थानमध्येही राजकीय हालचाली तीव्र झाल्या आहे. (File Photo)
जयपूर, 21 सप्टेंबर: पंजाबमधील (Punjab political crisis) राजकीय घडामोडींनंतर राजस्थानमध्येही (Rajstan) राजकीय हालचाली तीव्र झाल्या आहे. त्यामुळे येत्या काळात राजस्थानातील राजकारण कोणत्या दिशेनं जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia gandhi) यांनी नुकताच मुख्यमंत्री अशोक गहलोत (CM Ashok Gehlot) यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आहे. यावेळी सोनिया गांधी यांनी राजस्थानातील राजकीय परिस्थितीवर चर्चा केली आहे. तर चारच दिवसांपूर्वी पीसीसीचे माजी प्रमुख सचिन पायलट (Sachin Pilot) यांनी देखील राहुल गांधी (Rahul gandhi) यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गेहलोत यांचा सोनिया गांधींशी फोनवरून संवाद आणि सचिन पायलट यांची राहुल गांधींची प्रत्यक्ष भेट ही राजस्थानातील नवीन राजकीय समीकरणे असल्याचं राजकीय विश्लेषक मानत आहेत. पंजाबमधील घडामोडींनंतर राजस्थान आणि छत्तीसगडमधील राजकीय परिस्थितीवर लोकांच्या नजरा आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आहे. सोनिया यांनी गेहलोत यांच्याशी राज्यातील राजकीय परिस्थितीवर बोलल्या आहेत. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारासह विविध मुद्यांवरही चर्चा झाली आहे. हेही वाचा- महंत नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद मृत्यू, खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह दुसरीकडे, तीन दिवसांपूर्वी 17 सप्टेंबर रोजी माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी दिल्लीत राहुल गांधींची भेट घेतली आहे. पायलट यांनी राहुल गांधी यांच्याशी सुमारे दीड तास चर्चा केल्याचं सांगितलं जात आहे. पंजाबमधील घडामोडींनंतर सध्याच्या परिस्थितीत पायलट आणि राहुल यांची बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. जवळजवळ एक वर्षानंतर दोघांची प्रत्यक्ष भेट झाली आहे. हेही वाचा- QUAD समिटसाठी अमेरिकेचं भारताला आमंत्रण, चीनचा पारा चढण्याची शक्यता राहुल गांधी आणि सचिन पायलट यांच्या बैठकीत राजस्थानच्या राजकीय परिस्थितीसह तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. सूत्रांनी केलेल्या दाव्यानुसार, दोघांच्या बैठकीत राजस्थानमधील काँग्रेस पक्षाची मजबूती आणि मंत्रिमंडळातील बदल आणि पायलट यांची स्वतःची भूमिका यावर चर्चा झाली आहे. त्यामुळे पुढील महिन्यापर्यंत मंत्रिमंडळ आणि संघटनेत काही बदल होण्याची शक्यता असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.