JOIN US
मराठी बातम्या / देश / Aaditya Thackeray Ayodhya tour: आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध; हनुमानगढीच्या महंतांनी म्हटलं, भक्त म्हणून या पण...

Aaditya Thackeray Ayodhya tour: आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध; हनुमानगढीच्या महंतांनी म्हटलं, भक्त म्हणून या पण...

Aaditya Thackeray Ayodhya tour: राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचा आज अयोध्या दौरा आहे. त्यासाठी शिवसेनेने मोठी तयारी केली आहे. मात्र, त्याच दरम्यान अयोध्येतून एक मोठी बातमी समोर आली आहे.

जाहिरात

आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध; हनुमानगढीच्या महंतांनी म्हटलं, "येताय तर भक्त म्हणून या पण..."

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अयोध्या, 15 जून : शिवसेनेचे नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) अयोध्या दौऱ्यावर (Aaditya Thackeray Ayodhya tour) आहेत. त्यासाठी शिवसेनेनं जय्यत तयारीही केलीय. शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि एकनाथ शिंदे आधीच अयोध्येत दाखल झालेत. त्यांच्यासोबत हजारोंच्या संख्येने शिवसैनिक विशेष एक्सप्रेस आणि विमानाने अयोध्येत दाखल झाले आहेत. त्यामळे अयोध्येतलं वतावरण भगवामय झालंय. काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. तर खासदार बृजभूषण सिंह यांनी आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याचं स्वागत केलं आहे. मात्र, त्याच दरम्यान आता हनुमानगढीच्या महंतांनी एक मोठं विधान केलं आहे. काय म्हणाले हनुमानगढीचे महंत? हनुमानगढीचे महंत राजू दास महाराज (Hanumangarhi Mahant Raju Das Maharaj) यांनी म्हटलं, हिंदू सतर्क आणि जागरुक आहे. संजय राऊत यांनी म्हटलं होतं, संजय राऊत यांचा अयोध्या दौरा राजकीय नसणार… पण आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी संपूर्ण अयोध्येत पोस्टर्स, होर्डिंग्स लावण्यात आले आहेत. हा एक राजकीय दौरा नाहीये. याव… प्रत्येकाने अयोध्यात यावं, सर्वांचं स्वागत आहे. पण पोस्टरजाबी करुन अयोध्येत येणं हा राजकीय दौरा नाही का? महाराष्ट्रात हनुमान चालीसा पठण करणाऱ्यांना 14 दिवस कारागृहात टाकलं जातं. असे लोक अयोध्येत येऊन काय संदेश देऊ इच्छित आहेत.

संबंधित बातम्या

महंत राजू दास महाराज यांनी संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटलं, संजय राऊत हे काल नया घाट इथे उपस्थित होते आणि तरीही आरतीत सहभागी झाले नाहीत. हे सरड्या सारखे रंग बदलणारे लोक आहेत. अशा लोकांपासून सावधान राहण्याची आवश्यकता आहे.

याव.. भक्तांसारखं यावं… माला-फुलांनी स्वागत करु पण हे राजकीय उद्देशाने येत आहेत आणि त्यामुळे त्यांचा विरोध करत आहोत असंही महंत राजू दास महाराज यांनी म्हटलं आहे. वाचा :  ‘पुतण्याचं अयोध्येत स्वागत, पण काका राज ठाकरेंना नो एंट्रीच’ बृजभूषण सिंह स्पष्टच बोलले आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याची सुरवात लखनऊ विमानतळावर त्यांच्या आगमनाने होणार आहे. लखनऊ विमानतळावर आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी शेकडो शिवसैनिक उपस्थित रहाणार आहेत. लखनऊ विमानतळावरून आदित्य ठाकरे कारने अयोध्येकडे निघतील. वाटेत इस्काँन मंदिरात ते दर्शन घेणार आहेत. वाचा :  ब्रृजभूषण सिंह आणि संजय राऊत अयोध्येत आले एकाच घाटावर, पण भेट टाळली! त्यानंतर पंचशिल हाँटेलमध्ये पत्रकार परिषद घेऊन हनुमान गढीला दर्शनासाठी जाणार आहेत. राम भक्तं हनुमानाचे दर्शन झाल्यावर आदित्य ठाकरे प्रभू श्री राम जन्मं भूमीवर रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर लक्ष्मण किला आणि सर्वात शेवटी शरयू नदीवरील नया घाटावर महाआरती आदित्य ठाकरे करणार आहेत. शरयू नदीवरील महाआरतीसाठी शिवसेनेनं मोठी तयारी केल्याचं दिसून येतंय. अयोध्या दौरा संपल्यावर रात्री उशीरा आदित्य ठाकरे मुंबईकडे रवाना होतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या