JOIN US
मराठी बातम्या / देश / हृदयविकाऱ्याच्या झटक्याने आई बेशुद्ध, 7 वर्षांच्या मुलाने असा वाचवला आईचा जीव

हृदयविकाऱ्याच्या झटक्याने आई बेशुद्ध, 7 वर्षांच्या मुलाने असा वाचवला आईचा जीव

मुलाच्या हुशारीमुळे त्याच्या आईचा जीव वाचला. या मुलाचं मोठं कौतुक केलं जात आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

गांधीनगर, 6 जानेवारी : लहान मुलांना आपात्कालीन सेवेची माहिती देणं किती फायदेशीर होऊ शकतं, याचं एक चांगलं उदाहरण सूरतमध्ये (Gujrat News) पाहायला मिळालं आहे. एका 7 वर्षांच्या मुलाने समजूतदारपणे आईचा जीव वाचवला. या मुलाच्या आईला हार्ट अटॅक (Heart Attack) आला होता आणि ती बेशुद्ध झाली होती. यानंतर मुलाने तातडीने 108 वर कॉल करून रुग्णवाहिकेला बोलावलं. 5 मिनिटात रुग्णवाहिका पोहोचली आणि महिलेला सिव्हील रुग्णालयात पोहोचवलं. तातडीने उपचार मिळाल्यामुळे आईचा जीव वाचला. (A 7-year-old boy saved his mother’s life due to a heart attack) थोडा जरी उशिर झाला असता तर… आईला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर 7 वर्षांच्या मुलाने उचललेलं पाऊल पाहून डॉक्टरही चकीत झाले. यावर डॉक्टर म्हणाले 7 वर्षांच्या मुलाला इतकी माहिती असणं मोठी गोष्ट आहे. जर 1 तास जरी उशीर झाला असता तर महिलेचा जीव जावू शकला असता. सध्या महिलेची प्रकृती धोक्याच्या बाहेर आहे. **जाग आली तेव्हा रुग्णालयात होते…मंजू पांडे हे ही वाचा-** लसीकरणानंतर मुलांना Paracetamolची गरज? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी राहुलने सांगितलं की, एकदा माझ्या बहिणीने सांगितलं होतं की, कोणाचीही तब्येत बिघडली तर 108 नंबरवर फोन करून रुग्णवाहिका बोलावता येते. आजारी मंजूने सांगितलं की, जेव्हा मला जाग आली तेव्हा मी रुग्णालयात होते. 40 वर्षीय मंजू पांडे उत्तर प्रदेशातील अयोध्याची राहणारी आहे. ती आपल्या पती-मुलासह संजय नगरमध्ये राहते. बुधवारी दुपारी तिला उलट्या सुरू झाल्या आणि थरथराट सुरू झाला. ती बेशुद्ध झाली. अशात 7 वर्षांचा मुलगा राहुलने तातडीने 108 वर फोन करून रुग्णवाहिका बोलावली. सिव्हीलमध्ये ऑन ड्यूटी मेडिकल ऑफिसरनी सांगितलं की, हा मुलगा खूप हुशार आहे. सर्वसाधारणपणे मुलं मोबाइलवर गेम खेळत असतात किंवा कार्टून पाहत असतात. मात्र या मुलाने मोबाइलचा योग्य वापर केला. त्याने तातडीने रुग्णवाहिका बोलावली आणि आपल्या आईचा जीव वाचवला.

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या