नवी दिल्ली 08 जून: विस्ताराच्या मुंबई - कोलकाता या विमानात झालेल्या अपघातात (Vistara’s Mumbai-Kolkata flight hit turbulence) 8 प्रवासी जखमी झाले आहेत. यातील तीन लोकांची परिस्थिती गंभीर असल्याचं समोर आलं आहे. फ्लाईट UK775 या विस्ताराच्या विमानानं सोमवारी संध्याकाळी मुंबईहून कोलकाताच्या दिशेनं उड्डाण केलं. दरम्यान काही वेळानंतर हे विमान वातावरणात निर्माण झालेल्या एअर पॉकेटला म्हणजेच हवेच्या पोकळीला धडकलं. मात्र, सुदैवानं कोणतीही मोठी दुर्घटना घडलेली नाही. गंभीर जखमी असणाऱ्या प्रवाशांना कोलकात्यातील स्थानिक रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं आहे. वैमानिकाच्या सतर्कतेमुळे विमान कोलकात्यातील नेताजी सुभाष चंद्र बोस अंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितरित्या लँड करण्यात आलं. वैमानिकासह इतर सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचं सांगितलं जात आहे. तर, दुसरीकडे वादळी वाऱ्यांमुळे पश्चिम बंगालमध्येही विजांनी कहर घातला होता. यात 26 लोकांचा वीज पडून मृत्यू झाला (26 Dead in Lightning Strike) आहे. यातील 9 लोक मुर्शिदाबाद जिल्ह्यातील होते. रघुनाथगंजमध्ये वीज कोसळल्यानं 8 जण जखमी झाले आहेत. याशिवाय वीज कोसळून हुगलीमध्ये 11, बांकुरामध्ये 2, पूर्वी मिदनापुर आणि पश्चिम मिदनापुरमध्ये प्रत्येकी 2 लोकांनी आपला जीव गमावला आहे. Pune Fire: DNA घेऊन पटवणार मृतांची ओळख, मृत्यू झालेल्या 17 जणांची नावं आली समोर पंतप्रधान कार्यालयाकडून ट्विट करण्यात आलं आहे की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या वेगवेगळ्या भागात वीज पडून मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2-2 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. तर, जखमींना 50 हजार रुपये आर्थिक मदत म्हणून देण्यात येणार आहेत. दरम्यान विमान दुर्घटनेबद्दल बोलताना विमानतळाचे संचालक म्हणाले, की खराब हवामानामुळे ही घटना दुपारी 4 च्या सुमारास घडली. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून लवकर या दुर्घटनेबाबतची संपूर्ण माहिती दिली जाईल, असं विस्ताराच्या प्रवक्त्यानं म्हटलं आहे.