JOIN US
मराठी बातम्या / देश / जीवलग मित्रानं गोड बोलून नेलं अन् 6 जणांच्या हवाली केलं, 13 वर्षीय मुलीसोबत किळसवाणं कृत्य

जीवलग मित्रानं गोड बोलून नेलं अन् 6 जणांच्या हवाली केलं, 13 वर्षीय मुलीसोबत किळसवाणं कृत्य

Minor Girl Gang Rape: एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्या जीवलग मित्रानं दगा दिला आहे. आरोपी तरुणानं पीडितेला खोटं बोलून एका निर्मनुष्य ठिकाणी नेत, तिच्यासोबत अमानुष कृत्य केलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रांची, 29 ऑगस्ट: एखाद्या मित्रावर अंधपणानं विश्वास ठेवणं किती धोकादायक ठरू शकतं, याचा प्रत्यय नुकताच एका धक्कादायक घटनेत आला आहे. एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्या जीवलग मित्रानं दगा दिला आहे. आरोपी तरुणानं पीडितेला खोटं बोलून एका निर्मनुष्य ठिकाणी नेत, आपल्या मित्रांसोबत तिच्यावर सामूहिक बलात्कार (Gang raped on minor girl) केला आहे. यानंतर आरोपींनी अपरात्री पीडित मुलीला तिच्या मैत्रिणीच्या घरी सोडून पोबारा केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या (4 accused arrest) आहेत. अन्य तीन आरोपींचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. संबंधित घटना झारखंड (Jharkhand) राज्यातील रांची (Ranchi) येथील एका गावातील आहे. पीडितेनं पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं की, तिने गुरुवारी गावातील एका मित्रासोबत फिरायला जाण्याचा प्लॅन बनवला होता. या प्लॅननुसार ती आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून फिरायला गेली. पण तिच्या मित्रानं तिला एका निर्मनुष्य ठिकाणी नेलं. जिथे आरोपी मित्राचे अन्य सहा मित्र आधीपासूनच उपस्थित होते. याठिकाणी गेल्यानंतर पीडित मुलगी घाबरली. तिने आपल्या मित्राला त्वरित घरी सोडायला सांगितलं. पण मित्रानं तिला रोखून ठेवलं. हेही वाचा- औरंगाबादेत महिलेला विवस्त्र करून मारहाण; रस्त्यावरील लोकांनी दिले अंगावरचे कपडे तिने घरी जाण्यासाठी आपल्या मित्राकडे अनेकदा विनंती केली. पण मित्रानं काही ऐकलं नाही. यावेळी मित्रानं म्हटलं की, आम्हाला तुझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे आहेत. हे ऐकून पीडित मुलीनं पळायला सुरुवात केली. पण आरोपी मित्राच्या अन्य सहा साथीदारांनी तिला पकडलं. यानंतर सातही आरोपीनं संपूर्ण रात्रभर 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर आळीपाळीनं बलात्कार केला आहे. यानंतर आरोपींनी रात्री उशीरा पीडित मुलीला तिच्या एका मैत्रिणीच्या घरी सोडलं आणि पळ काढला. हेही वाचा- रक्षाबंधनासाठी बायकोला माहेरी घेऊन गेला अन् परतलाच नाही; जुन्या BF ने काढला काटा मैत्रिणीच्या घरी संपूर्ण रात्र घालवल्यानंतर पीडित मुलगी दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या घरी गेली. यावेळी तिने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार आपल्या आई वडिलांना सांगितला. यानुसार नातेवाईकांनी मांडर पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली. पीडित मुलीच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी तातडीनं पावलं उचलत चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. हेही वाचा- वंशाच्या दिव्यासाठी महिलेला नग्न करून अंगारा फासला, पुण्यातील संतापजनक घटना संबंधित सर्व आरोपी सरासरी 16 वर्षांचे आहेत. अद्याप तीन आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. संबंधित सर्व आरोपी पीडित मुलीच्या ओळखीतले असून सर्वांनी नियोजन आखून हा सामूहिक बलात्कार केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. याप्रकरणी पीडित मुलीची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या