JOIN US
मराठी बातम्या / देश / लग्नाच्या 3 महिन्यानंतर पतीचं खरं रुप समोर, कारसाठी पैसे न आणल्यानं पाजलं अ‍ॅसिड

लग्नाच्या 3 महिन्यानंतर पतीचं खरं रुप समोर, कारसाठी पैसे न आणल्यानं पाजलं अ‍ॅसिड

Crime in Gwalior: कार खरेदी करण्यासाठी माहेरून तीन लाख रुपये न आणल्यानं एका व्यक्तीनं आपल्या पत्नीसोबत क्रूरतेच्या सर्व परिसीमा गाठल्या आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ग्वाल्हेर, 21 जुलै: कार खरेदी करण्यासाठी माहेरून तीन लाख रुपये न आणल्यानं एका व्यक्तीनं आपल्या पत्नीसोबत क्रूरतेच्या सर्व परिसीमा गाठल्या आहेत. आरोपी पतीनं पीडित तरुणीला अ‍ॅसिड पाजून तिचा हत्येचा प्रयत्न केला आहे. अ‍ॅसिड पाजल्यामुळे पीडित विवाहितेचा घसा आणि पोटातील आतडी जळली आहेत. दिल्लीतील एका खाजगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू असून प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांत फिर्याद दाखल केली असून फरार आरोपी पतीचा शोध घेतला जात आहे. वीरेंद्र जाटव असं आरोपी पतीचं नाव असून त्याचा तीन महिन्यांपूर्वी ग्वाल्हेर येथील शशि नावाच्या मुलीशी लग्न झालं होत. लग्नाला तीन महिनेही उलटली नाहीत. तोपर्यंत आरोपी पती वीरेंद्रने आपल्या पत्नीचा छळ सुरू केला होता. आरोपीनं कार खरेदी करण्यासाठी पत्नीनं माहेरून तीन लाख रुपये आणावेत, यासाठी तगादा लावला होता. पण पीडितेनं माहेरून पैसे आणण्यासाठी नकार दिला. दरम्यान 28 जून रोजी, संतापलेल्या आरोपी पतीनं पत्नीला अ‍ॅसिड पाजलं. या दुर्दैवी घटनेत पत्नी शशि या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांचा घसा आणि पोटातील आतडी जळाली आहेत. हेही वाचा- क्षुल्लक कारणावरुन मुलगाच उठला जीवावर, छातीत स्क्रू ड्रायव्हर खूपसून आईची हत्या याप्रकरणी पीडितेच्या आईनं घटनेच्या पाच दिवसांनी आरोपी जावयाविरोधात ग्वाल्हेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. पण पोलिसांनी पीडित कुटुंबाच्या तक्रारीला थंड प्रतिसाद दिला. घटना घडल्यानंतर जवळपास वीस दिवसांनी पोलीस तपासाठी दिल्लीला रवाना झाले आहेत. विशेष म्हणजे पोलिसांनी हत्येचा प्रयत्न आणि अ‍ॅसिड हल्ला अशी दोन महत्त्वाची कलमं देखील जोडली नव्हती. हेही वाचा- अमानुषतेचा कळस! विजेचा धक्का देऊन केला वडिलांचा खून; रात्री ट्रॉलीत नेऊन… या घटनेत दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी हस्तक्षेप केल्यानंतर पोलिसांनी संबंधित दोन्ही कलमं देखील लावली आहेत. 19 जुलै रोजी पीडित महिलेचा जबाब नोंदवून घेण्यात आला आहे. यावेळी पीडित तरुणीनं तिच्या पतीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. तिनं सांगितलं की, नवराचं आपल्याच वहिनीसोबत प्रेमसंबंध आहेत. 28 जून रोजी सकाळी दोघांनी मिळून आपल्याला अॅसिड पाजलं असल्याची माहितीही पीडितेनं दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी नवऱ्याच्या वहिनीला अटक केली आहे. आरोपी पतीचा शोध सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या