JOIN US
मराठी बातम्या / देश / SpiceJet चं मुंबई-दुर्गापूर विमान लँडिंगदरम्यान वादळात सापडलं, अनेक प्रवासी जखमी

SpiceJet चं मुंबई-दुर्गापूर विमान लँडिंगदरम्यान वादळात सापडलं, अनेक प्रवासी जखमी

स्पाईसजेटच्या प्रवक्त्याने सांगितलं की, 1 मे रोजी, स्पाईसजेटचे बोईंग B737 विमान मुंबई ते दुर्गापूर विमान पश्चिम बंगालच्या दुर्गापूर जिल्ह्यातील काझी नझरुल इस्लाम या विमानतळावर उतरत असताना ही दुर्घटना घडली

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 02 मे : स्पाईसजेटच्या मुंबई-दुर्गापूर विमानाला (Mumbai-Durgapur flight) रविवारी विमानतळावर लँडिंग करताना मोठ्या वादळाचा सामना करावा लागला (SpiceJet Flight Hits Turbulence). यादरम्यान विमानातील किमान 12 प्रवासी जखमी झाले. जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. देशाच्या इतिहासात प्रथमच होणार एका महिलेला फाशी, जाणून घ्या गुन्हेगाराच्या कानात जल्लाद काय शेवटचे शब्द बोलतो स्पाईसजेटच्या प्रवक्त्याने सांगितलं की, “1 मे रोजी, स्पाईसजेटचे बोईंग B737 विमान मुंबई ते दुर्गापूर विमान पश्चिम बंगालच्या दुर्गापूर जिल्ह्यातील काझी नझरुल इस्लाम या विमानतळावर उतरत असताना ही दुर्घटना घडली. खराब वातावरणामुळे आणि वादळामुळे लँडिंगदरम्यान विमानातील अनेक प्रवासी जखमी झाले. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेदरम्यान अनेक प्रवासी चांगलेच घाबरले असल्याचं सांगण्यात येत आहे. सीटवर ठेवलेलं सामान खाली पडल्यानं परिस्थिती अधिकच गंभीर बनली होती. मात्र, वैमानिकांच्या सतर्कतेमुळे प्रवाशांनी भरलेलं हे विमान व्यवस्थितपणे वादळातून बाहेर काढण्यात आलं. एप्रिलमध्ये उष्णतेने गाठला उच्चांक; 122 वर्षांतील सर्वात कडक उन्हाळा, मे महिन्यात कशी असेल स्थिती? विमान दुर्गापूर इथे उतरल्यानंतर तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आल्याचं प्रवक्त्यानं सांगितलं. “स्पाईसजेटला या दुर्दैवी घटनेबद्दल खेद वाटतो आणि जखमींना सर्व शक्य वैद्यकीय मदत पुरवत आहोत,” असं ते म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या