JOIN US
मराठी बातम्या / देश / अवघे 4 सेकंद अन् अनियंत्रित कारच्या कचाट्यात सापडले 6 जण; भीषण अपघाताचा LIVE VIDEO

अवघे 4 सेकंद अन् अनियंत्रित कारच्या कचाट्यात सापडले 6 जण; भीषण अपघाताचा LIVE VIDEO

ही कार अनियंत्रित झाल्याचं दिसून येतं. यानंतर सुरुवातीला ही कार एका दुचाकीला धडक देते. ही दुचाकी उडून रस्त्याच्या बाजूला पडते

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लखनऊ 11 मे : रस्त्यावरुन जाताना नेहमी सतर्क आणि सावधान असावं, असा सल्ला अनेकदा दिला जातो. बऱ्याचदा स्वतःची चूक नसतानाही काही दुर्घटनांना सामोरे जावं लागतं. अनेकदा अशा परिस्थितीत लोकांना आपला जीवही गमवावा लागतो. रस्त्यावरुन जाताना कधी आणि कोणासोबत काय घडेल, हे कोणीही सांगू शकत नाही. अशा घटनांचे व्हिडिओही अनेकदा आपल्याला पाहायला मिळतात. समुद्रकिनारी सेल्फी घेणं भोवलं; मोठी लाट येताच पाण्यासोबत वाहून गेले पर्यटक, VIDEO सध्या सोशल मीडियावर अशाच एका अपघाताचा व्हिडिओ व्हायरल (Terrible Accident Video) झाला आहे. हा व्हिडिओ उत्तर प्रदेशच्या उन्नाव येथील आहे. व्हिडिओमध्ये दिसतं की अगदी गर्दीच्या ठिकाणी एक चारचाकी अनियंत्रित होते. इथे नेमकं काय घडतंय याची कल्पना तिथे उपस्थित लोकांना येण्याआधीच रस्त्यावर भयंकर अपघात होतो. घटनेचा व्हिडिओ पाहून तुमचाही थरकाप उडेल.

व्हिडिओमध्ये दिसतं की एक कार रस्त्यावरुन जात आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला लोकांची मोठी गर्दी आहे. व्हिडिओ पाहता रस्त्याच्या बाजूलाच वस्तू खरेदी करण्यासाठी लोकांनी गर्दी केल्याचं दिसतं. तर रस्त्यावरुन गाड्याही ये-जा करत आहेत. इतक्यात अचानक एक कार तिथे येते. ही कार अनियंत्रित झाल्याचं दिसून येतं. यानंतर सुरुवातीला ही कार एका दुचाकीला धडक देते. ही दुचाकी उडून रस्त्याच्या बाजूला पडते. दुचाकीची धडक बसल्याने बाजूला उभा असलेला एक व्यक्तीही खाली कोसळतो. चालकाशिवाय आपोआप चालू लागली पार्किंगमधील बाईक; Horror film मधील नाही हा रिअल Shocking video ही कार तिथेच थांबत नाही तर आणखी काही अंतर जाताच दुसऱ्या एका दुचाकीलाही जोरदार धडक देते. समोर आलेल्या माहितीनुसार, या भीषण एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर सहाजण जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या