07 एप्रिल : समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन यांनी काँग्रेसवर टीका केलीय. काँग्रेस अहंकारी असून काम झाल्यावर माणसांना वार्यावर सोडण्याची त्यांची वृत्ती असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. मुलायमसिंग यांनी काँग्रेसला पाठिंबा देवू नये असंही त्यांनी आयबीएन 7 शी बोलताना सांगितलं.