JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नाशिक / Shirdi Sai Baba: शिर्डी साई संस्थानकडून दर्शनासाठी नियमावली जाहीर, दररोज 15 हजार भाविकांना दर्शन

Shirdi Sai Baba: शिर्डी साई संस्थानकडून दर्शनासाठी नियमावली जाहीर, दररोज 15 हजार भाविकांना दर्शन

Shirdi Sai Baba Sansthan Trust announce guidelines: नवरात्रौत्सवापासून राज्यातील मंदिरे पुन्हा खुली होत आहेत. यासाठी शिर्डी साई संस्थानकडून भाविकांसाठी दर्शनाच्या संदर्भात नियमावली जाहीर केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

शिर्डी, 5 ऑक्टोबर : राज्यभरातील देवस्थाने 7 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू होत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच मंदिरात गर्दी होऊ नये यासाठी शिर्डी साईबाबा संस्थान ट्रस्ट (Shri Sai Baba Sansthan Trust Shirdi) कडून नियमावली जाहीर कऱण्यात आली आहे. त्यानुसार दररोज 15 हजार भाविकांना दर्शनासाठी मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. तर साईबाबांची काकड आरती (Sai Baba Kakad Aarti), माध्यान्ह आरती, सायंआरतीसाठी 80 भाविकांना सशुल्क प्रवेश देण्यात येणार आहे अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली आहे. पाहूयात कशी आहे ही नियमावली. साई संस्थान कडून नियमावली जाहीर घटस्थापनेच्या दिवशी सात ऑक्टोबरपासून साईमंदिर भक्तांसाठी खुले दररोज 15 हजार भाविकांना दिले जाणार दर्शन 5 हजार ऑनलाईन, 5 हजार सशुल्क पासद्वारे तर 5 हजार भक्तांना शिर्डीत ऑफलाईन मिळणार मोफत दर्शन पास दर तासाला 1150 भाविकांना दिले जाणार दर्शन साईबाबांची काकड आरती, माध्यान्ह आरती, सायंआरतीसाठी 80 भाविकांना सशुल्क प्रवेश… तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून नवरात्रोत्सवासाठी नियमावली जाहीर प्रत्येक आरतीला 10 ग्रामस्थांना प्रवेश 65 वर्षावरील नागरिकांना आणि 10 वर्षांखालील बालकांना मंदिरात प्रवेश नाही साईभक्तांना कोरोना नियमांचे पालन करावे लागणार साई मंदिरात फुल हार प्रसाद घेऊन जाण्यास मनाई साई मंदिराचे भक्तनिवासही सुरू होणार साईमंदिर प्रशासनाकडून मंदिर सुरू करण्याची तयारी पूर्ण नवरात्रीपासून राज्यातील सर्व मंदिरं उघडणार नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे 7 ऑक्टोबर पासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्यात येणार आहेत. नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे 7 ऑक्टोबर पासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणतात की, दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे आपण नियोजन केले आहे केले आहे. मात्र हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बऱ्याच बाबतीत निर्बंध शिथिल करीत आलो आहोत. सध्या कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये उतार येत असला तरी आपल्याला अधिक सावध राहावे लागेल. ‘धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली केली असली तरी त्याठिकाणी आरोग्याच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे. चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशकाचा वापर हा झालाच पाहिजे. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची यामध्ये मोठी जबाबदारी आहे हे विसरू नये’ असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. ‘दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे आपण नियोजन केले आहे. मात्र हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बऱ्याच बाबतीत निर्बंध शिथिल करीत आलो आहोत. सध्या कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये उतार येत असला तरी आपल्याला अधिक सावध राहावे लागेल’ असंही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या