JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नाशिक / रोईंगपटू दत्तू भोकनळवर नांगरणी करण्याची वेळ, सैन्यदलाला ठोकला रामराम

रोईंगपटू दत्तू भोकनळवर नांगरणी करण्याची वेळ, सैन्यदलाला ठोकला रामराम

आताही ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्याने दत्तूचा नियमित सराव सुरू होता. मात्र,अचानक दत्तूला फेडरेशननं कमी करण्याचा निर्णय घेतला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नाशिक, 12 जुलै: रोईंग स्पर्धेत (rowing game) भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या आंतरराष्ट्रीय रोईंगपटू दत्तू भोकनळवर (Rowing player Dattu Bhokanal resigned) आता शेतात नांगरणी करण्याची वेळ आली आहे. ऑलिम्पिकसाठी तयारी करत असताना अचानक दत्तू भोकनळला सरावातून डावलण्यात आल्यामुळे त्याने सैन्य दलाचा राजीनामा दिला आहे. दत्तूसोबत नेमकं काय घडलं? या प्रश्नामुळे क्रीडा क्षेत्रात खळबळ उडाली आहे. नाशिक जिल्ह्याच्या शेतकरी कुटुंबातील दत्तूनं रोईंग स्पर्धेत 2014 ला भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं आणि जागतिक स्तरावर आपल्या देशाची मान उंचावली. येत्या ऑलिम्पिक स्पर्धेतही तो चमकदार कामगिरी करणार, हा विश्वास असतानाच, त्याला अचानक सराव शिबिरातून हटवण्यात आलं आहे. लष्करी शिस्तीत असल्यानं त्यानं सातत्यानं प्रयत्न केले की याचं कारण काय? मात्र,उत्तर न मिळाल्यानं निराश झालेल्या दत्तूनं अखेर लष्करी सेवेचा राजीनामा दिला. कोरोनाची लस घेतल्यावर किती दिवस करू नये सेक्स? वाचा शास्त्रज्ञांचा सल्ला आज नाशिक जिल्ह्यातील आपल्या गावी दत्तू शेतात नांगरणी करत आहे. मात्र एका प्रश्नाचं उत्तर काही दत्तूला मिळायला तयार नाही. त्याला सतावतोय एकंच प्रश्न. माझं काय चुकलं ? पाण्यातील प्रवाहाचा वेग कसाही असो, तो कधी अनुकूल तर प्रतिकूल. मात्र,सपासप हॅट चालवीत,आपल्या हातातल्या वल्ह्यानं अंतर कापत दत्तूनं 2014 ला,सुवर्णपदक मिळवलं आणि एक इतिहास घडला. याच स्पर्धेत, दत्तूनं दुसरंही सुवर्णपदक मिळवलं आणि त्यानंतर त्यानं मागे वळून पाहिलंच नाही. जगात ठसा उमटवणाऱ्या दत्तूचं कौतुक थेट पंतप्रधानांनी केलं. सैन्यदलातही त्याला बढती मिळाली.

2015 ला आशियाई चॅम्पिअनशीप 2016 ला चीन मधील रोईंग स्पर्धा पदकांनी गाजवत दत्तू 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये पोहोचला. आताही ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्याने दत्तूचा नियमित सराव सुरू होता. मात्र,अचानक दत्तूला फेडरेशननं कमी करण्याचा निर्णय घेतला. पुन्हा सैन्यात माघारी आलेल्या दत्तू भोकनळनं सातत्यानं प्रयत्न केला कारण जाणून घेण्याचा.  अखेर कोणतंही उत्तर न मिळाल्यानं, दत्तूनं सैन्यदलाला रामराम ठोकला. पाहा अजय देवगणचा ढासू अंदाज; Bhuj: The Pride Of India ट्रेलर प्रदर्शित आज,रोईंग खेळातील, आपल्या देशातील पहिला अर्जुन पुरस्कार सन्मानित दत्तू आपल्या नाशिक जिल्ह्याच्या चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही या आपल्या गावी, शेतात नांगरणी करतोय. फेडरेशनमधील राजकारणाचा फटका दत्तूला बसला का? हा प्रश्न अनुत्तरीत असला तरी दत्तूला मात्र एकच प्रश्न सतावतोय, माझं काय चुकलं ? आपल्यावर झालेल्या अन्यायाची सल त्याला बोचतेय. त्यानं अनेकवेळा सर्व स्तरावर प्रयत्न केले,विचारणा केली. तरी त्याला अद्यापपर्यंत काही उत्तर मिळालं नाही. करिअरच्या ऐन बहरात असतांना,दत्तूवर आलेल्या या वेळेला जबाबदार फेडरेशन असल्याचा गंभीर आरोप दत्तूने केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या