JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नाशिक / Nashik: पत्नीचा छळ करून लुबाडला 1 कोटींचा ऐवज; करुण कहाणी ऐकून पोलीसही हादरले!

Nashik: पत्नीचा छळ करून लुबाडला 1 कोटींचा ऐवज; करुण कहाणी ऐकून पोलीसही हादरले!

Crime in Nashik: पत्नीचा छळ करून तिच्याकडून आणि तिच्या कुटुंबीयांकडून तब्बल 1 कोटी रुपयांचा ऐवज लुबाडल्याची (Looted Rs 1 crore) धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

जाहिरात

प्रातिनिधीक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नाशिक, 29 ऑक्टोबर: पत्नीचा छळ करून तिच्याकडून आणि तिच्या कुटुंबीयांकडून तब्बल 1 कोटी रुपयांचा ऐवज लुबाडल्याची (Looted Rs 1 crore) धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित विवाहितेनं नाशकातील गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी फसवणुकीसह कौटुंबीक हिंसाचार (Domestic violence) आणि अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी पतीसह सासू आणि सासऱ्याविरोधात एफआयआर नोंदवली आहे. या घटनेचा पुढील तपास गंगापूर पोलीस करत आहेत. नाशिक येथील रहिवासी असणाऱ्या पीडित महिलेचं काही दिवसांपूर्वी मुंबईतील जुहू परिसरात राहणाऱ्या क्षितिज शिशिर बेथारिया (वय-32) याच्यासोबत झालं होतं. लग्न झाल्यानंतर काही दिवस आनंदात गेले. पण त्यानंतर आरोपी नवरा क्षितिज आणि सासरच्या अन्य लोकांनी माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ सुरू (Persecution for dowry money) केला. माहेरून पैसे आणण्यासाठी आरोपींनी पीडित महिलेला अनेकदा शिवीगाळ आणि मारहाण (Married woman abused and beat) देखील केली आहे. हेही वाचा- शाळेत केलेल्या कृत्याचा 16वर्षांनी घेतला बदला; पुण्यात तरुणाला भररस्त्यात मारहाण हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही, तर आरोपीने पीडित विवाहितेची परवानगी न घेता संयुक्त बँक खात्यातून मोठी रक्कम काढून घेतली. तसेच पीडितेच्या वडिलांनी लग्नात दिलेलं स्त्रीधन, संसारोपयोगी महागड्या वस्तू असा तब्बल एक कोटींचा ऐवज सासरच्या लोकांनी लुबाडला आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून आरोपी पीडितेकडे आणखी पैशांची मागणी करत होते. आरोपींच्या छळाला कंटाळून पीडित महिला आपल्या माहेरी आल्या होत्या. हेही वाचा- पत्नी आणि मुलांसमोर सासऱ्याने सुनेवर केला बलात्कार; 8 वर्षे सुरू होता अत्याचार यानंतर, पीडित विवाहितेनं नाशकातील गंगापूर पोलीस ठाण्यात धाव घेत, आरोपी पतीसह सासू आणि सासरे यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पीडितेचा पैशांसाठी होणाऱ्या छळाची करूण कहाणी ऐकून पोलीसही हादरले आहेत. पोलिसांनी पती क्षितिज शिशीर बेथारिया, सासरे शिशीर श्यामलाल बेथारिया, सासू पल्लवी बेथारिया अशा तिघांविरोधात विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केली नसून या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या