JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नाशिक / छगन भुजबळ आणि शिवसेनेच्या आमदारामध्ये जोरदार खडाजंगी, भर सभेत शाब्दिक चकमक, VIDEO

छगन भुजबळ आणि शिवसेनेच्या आमदारामध्ये जोरदार खडाजंगी, भर सभेत शाब्दिक चकमक, VIDEO

तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत शिवसेनेचे आमदार (shivsena mla sushas kande) आणि भुजबळ यांच्यात जोरदार खडाजंगी पाहण्यास मिळाली.

जाहिरात

छोटा राजनच्या (Chhota Rajan) पुतण्याने फोनकरून धमकी दिल्याचा दावा कांदेंनी केला आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नांदगाव, 11 सप्टेंबर : नाशिकचे (nashik) पालकमंत्री आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (chagan bhujbal) यांचा नांदगावचा अतिवृष्टी दौरा वादळी ठरला आहे. तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत शिवसेनेचे आमदार (shivsena mla sushas kande) आणि भुजबळ यांच्यात जोरदार खडाजंगी पाहण्यास मिळाली. यामुळे काही काळ सभागृहात तणावाचे वातावरण पाहण्यास मिळाले. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ हे अतिवृष्टी भागाचा आढावा घेण्यासाठी नांदगावात पोहोचले होते. तहसील कार्यलयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ व शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्यात जोरदार खडाजंगी पाहण्यास मिळाली.

संबंधित बातम्या

आपत्कालीन निधीच्या मुद्द्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये झाली बाचाबाची झाली. अचानक घडलेल्या घटनेमुळे आढावा बैठकीत एकच गोंधळ उडाला.‘निधी मिळत नसल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना सांगून झाले, काहीच पुढे होत नाही’, असं म्हणत कांदे यांनी संताप व्यक्त केला. त्यावर भुजबळ म्हणाले की, आपण जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणार आहोत, जेव्हा एखाद्या मंत्र्याने जरी सांगितले असेल तर फोनवर जरी बोलणं झालं तर जिल्हाधिकाऱ्यांकडून काम होऊन जाईल, असं आश्वासन भुजबळ यांनी दिलं. बैठकीत झालेल्या वादानंतर आमदार सुहास कांदे समर्थकांनी पालकमंत्र्यांसमोरच घोषणाबाजी केली. त्यामुळे काही तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, त्याआधी भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी, मुंबई साकिनाका सामूहिक बलात्काराची घटना मनाला यातना आणणारी आहे. या घटनेतील पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे ऐकून धक्का बसला असून आरोपींना कडक शिक्षा व्हावी यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविला जाईल, अशी प्रतिक्रिया  छगन भुजबळ यांनी दिली. राज्यात महिलांच्या अत्याचाराबाबत कठोर कायदे करण्यात आलेआहे, तरी अशा घटना घडतात. समाजात अपप्रवृत्ती वाढत आहे. ही बाब चिंताजनक आहे. या प्रकरणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या सारख्या वकिलांची नियुक्ती करून आरोपींना कठोर शासन करू, असंही छगन भुजबळ यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या