JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नागपूर / "कितीही मोठा नेता असू द्या काँग्रेसचा... बेईमानी केली तर दोन लाथा घाला" मंत्री सुनील केदार यांचं वादग्रस्त वक्तव्य

"कितीही मोठा नेता असू द्या काँग्रेसचा... बेईमानी केली तर दोन लाथा घाला" मंत्री सुनील केदार यांचं वादग्रस्त वक्तव्य

Minister Sunil Kedar controversial statement: गद्दार नेत्यांना लाथा घाला, मंत्री सुनील केदार यांचे वादग्रस्त वक्तव्य. भाषणाचा व्हिडीओ होतोय व्हायरल.

जाहिरात

"कितीही मोठा नेता असू द्या काँग्रेसचा... बेईमानी केली तर दोन लाथा घाला" मंत्री सुनील केदार यांचं वादग्रस्त वक्तव्य

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर, 21 सप्टेंबर : राज्यातील पाच जिल्हा परिषद (Zill Parishad) आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समितींच्या पोटनिवडणुकांसाठी (Panchayat Samiti by polls) 5 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या प्रचाराला राजकीय रंग चढू लागला आहे. निवडणुकीपूर्वी नागपूर काँग्रेस कमिटीच्या आढावा बैठकीत राज्याचे दुग्ध आणि पशू संवर्धन मंत्री सुनील केदार यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. बेईमानी करणाऱ्या काँग्रेस नेत्याला गाडीतून ओढून दोन लाथा घाला असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. नेमकं काय म्हणाले सुनील केदार? कितीही मोठा नेता असून द्या जो जिल्हा परिषदच्या पोट निवडणुकीत काँग्रेस सोबत बेईमानी करेल त्या नेत्याला गाडीतून ओढून दोन लाथा लावा मारा, पोलीस केसेस मी बघून घेईल.. वेळ आली तर मी मंत्रिपद बाजुला ठेवेल मी पण पुढे येईल असं वक्तव्य मंत्री सुनील केदार यांनी नागपूर ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या बैठकीत केले आहे. “Sharad Pawar आमचे नेते होऊच शकत नाही, पाठीत खंजीर खुपसून NCP चा जन्म” शिवसेना नेत्याचा घणाघात गद्दारांना धडा शिकवण्याच्या संदर्भात मंत्री सुनील केदार यांनी केलेल्या या वक्तव्याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. तसेच या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुद्धा रंगण्यास सुरुवात झाली आहे. सुनील केदार यांचा रोख कुणाकडे? काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून बँक घोटाळ्याच्या संदर्भात कारवाई करण्याचं म्हटलं होतं. या पत्रात देशमुख यांनी सुनील केदार यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. सुनील केदार यांनी नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत भ्रष्टाचार केल्याचं देशमुखांनी म्हटलं आहे. 2002 मध्ये सुनील केदार हे नागपूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष असताना त्यांनी बँकेचे 150 कोटी रुपये खासगी दलालांमार्फत रोख्यांमध्ये गुंतवली आणि पूर्ण रक्कम गमवावी लागली. या दलाल कंपन्या सुनील केदार यांनी संगमनताने ही रक्कम सरकारी रोखे विकत घेण्यासाठी परस्पर दिली होती. या दलालांनी त्या संपूर्ण रक्कमेचा अपहार करुन बँकेला ना रोखे दिले ना पैसे परत दिले. यामुळे नागपूर जिल्हा बँकेचे 150 कोटींचे नुकसान झाले असा आरोपही देशमुख यांनी केला आहे. OBC आरक्षणाशिवायच जिल्हा परिषद निवडणूक, SC च्या निकालानंतर राज्य निवडणूक आयोगाची माहिती 5 ऑक्टोबरला मतदान धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम व नागपूर जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम पूर्ण करण्याच्या दृष्टीने 5 ऑक्टोबर 2021 रोजी मतदान घेण्यात येणार आहे. तसेच पालघर जिल्हा परिषदेच्या व त्यांतर्गतच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील त्याच दिवशी मतदान होईल आणि सर्व ठिकाणी 6 ऑक्टोबर 2021 रोजी मतमोजणी होईल. राज्य निवडणूक आयोगाने धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूरसह पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून कोरोना रुग्णांची संख्या व आठवडाभरातील दैनंदिन व मृतांच्या संख्येबाबत अहवाल मागविला होता. त्यावरून या सहा जिल्ह्यांतील कोरोना परिस्थिती आटोक्यात असल्याचे दिसून आले. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूरच्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी 22 जून 2021 रोजी जाहीर केलेल्या कार्यक्रमात पालघर जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा समावेश करण्यात आलेला नव्हता. कारण त्यावेळी कोविड-19 संदर्भातील राज्य शासनाच्या निकषानुसार पालघर जिल्ह्याचा समावेश स्तर-3 मध्ये होता. त्यामुळे तेथील पोटनिवडणुका जाहीर केलेल्या नव्हत्या. मात्र आता या सर्व निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या