आगीत 35 झोपड्या जळून राख झाल्या असून आगेत 22 घरातील सिलेंडरचा स्फोट झाला. त्यामुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते
नागपूर, 09 मे : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे. त्यामुळे तुम्ही घराशेजारी किंवा कुठेही कचरा पेटवला असला व तो पूर्णपणे न विझवता त्याकडे दुर्लक्ष करत असाल तर ते किती घाततक ठरू शकते हे आज नागपूरमध्ये समोर आले आहे. नागपूरच्या (nagpur mahakali slum area) महाकाली झोपडपट्टीमध्ये एका इसमाने घराशेजारी कचरा पेटला आणि कामावर निघून गेला. त्यामुळे नंतर लागलेल्या आगीत महाकाली झोपडपट्टीतील जवळपास 60 च्या वर झोपड्या जळून राख झाल्या आणि 22 गॅस सिलेंडरचे स्फोट झाले. नागपूरच्या बेलतारोडी परिसरातील महाकाली झोपडपट्टीला आज सकाळला 10 वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. आग इतकी भीषण होती की, आगीत 35 झोपड्या जळून राख झाल्या असून आगेत 22 घरातील सिलेंडरचा स्फोट झाला. त्यामुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. या आगीत 60 च्या वर झोपड्यातील साहित्य जळून पूर्णपणे राख झाल्याने अनेक कुटुंब उघड्यावर आले आहे.
सुरुवातीला शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी असा एक अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र जेव्हा अग्निशमन विभागाने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली ती धक्कादायक वास्तव पुढे आले. महाकाली झोपडपट्टीमध्ये एका इसमाने घराशेजारी कचरा पेटला व कामावर निघून गेला. त्यामुळे सुरुवातीला आगी शेजारी एक घर जळाले त्या आगेत घरच्या सिलेंडरचा स्फोट झाला आणि नंतर ती आग संपूर्ण परिसरात पसरली. त्याआगीने संपूर्ण महाकाली झोपडपट्टीला आपल्या विळख्यात घेतले. अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी पोहचून एक तासात आग विझली. ( नवरदेवाच्या कपड्यांवरून लग्नात राडा; अक्षता-फुलांच्या वर्षावाऐवजी झाली दगडफेक ) आगीत महाकाली झोपडपट्टीतील जवळपास 60 च्या वर झोपड्या जळून राख झाल्या. हातावर पोट असणारे अनेक कुटुंबे रस्त्यावर आले. अनेकांच्या स्वप्नाची या आगीने राखरांगोळी केली. त्यामुळे तुमची एक चूक अनेकांच्या आयुष्यावर किती परिणाम करू शकते हे या घटनेतून अधोरेखित झालं.