JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नागपूर / नागपुरात आज क्लिनिकल ट्रायलचा तिसरा टप्पा, लहान मुलांवरील लसीच्या प्राथमिक चाचणीला सुरुवात

नागपुरात आज क्लिनिकल ट्रायलचा तिसरा टप्पा, लहान मुलांवरील लसीच्या प्राथमिक चाचणीला सुरुवात

Covid Vaccine trails on children: आज नागपूर (Nagpur) शहरात लहान मुलांवर लसीच्या प्राथमिक चाचणीला सुरुवात झाली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर, 02 जुलै: कोरोनाची दुसरी लाट (Coronavirus 2nd wave) ओसरते ना ओसरते तोपर्यंत तिसरी लाट (Coronavirus 3rd wave) येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशा परिस्थितीत लहान मुलांचा (Children) कोरोनापासून बचाव करण्यासाठी कोविड प्रतिबंधक लस (Covid vaccine) फार महत्त्वाची ठरणार आहे. याचाच एक भाग म्हणून आता भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या लसीची लहान मुलांवर प्राथमिक चाचणी सुरू झाली आहे. देशभरातील एकूण चार ठिकाणी हे क्लिनिकल ट्रायल होणार असून त्यात महाराष्ट्रातील नागपूर शहराही (Nagpur, Maharashtra) समावेश आहे. आज नागपूर शहरात लहान मुलांवर लसीच्या प्राथमिक चाचणीला सुरुवात झाली आहे. आज नागपूरमध्ये 2 ते 6 वयोगटातील मुलांचं क्लिनिकल ट्रायल होणार आहे. नागपूरच्या मेडिट्रेना हॉस्पिटलमध्ये कोव्हॅक्सिन हे ट्रायल आहे. या आधी 6 ते 12 आणि 12 ते 18 या वयोगटातील मुलांचे क्लिनिकल ट्रायल झाले. गुरुवारी या क्लिनिकल ट्रायलसाठी लागणाऱ्या मुलांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. आज जे स्क्रिनिंग टेस्ट पास होईल ते क्लिनिकल ट्रायल साठी पात्र असणार आहे. हेही वाचा-  सिडकोच्या ‘त्या’ लाभार्थ्यांसाठी Good News, एकनाथ शिंदे यांची माहिती एकूण तीन टप्प्यात हे ट्रायल होत आहे. पहिल्या टप्प्यात 12 ते 18 वयोगटातील मुलांवर चाचणी, दुसऱ्या टप्प्यात 7 ते 11 वयोगटातील मुलांवर चाचणी आणि तिसऱ्या टप्प्यात 2 ते 6 वयोगटातील मुलांवर चाचणी होत आहे. आता याचा तिसरा टप्पा सुरु आहे. या क्लिनिकल ट्रायलमध्ये मुलांची रक्ताची तपासणी होते त्यानंतर मुलांवर क्लिनिकल ट्रायल केलं जातं. लहान मुलांना लस देण्याचे फायदे हर्ड इम्युनिटी तयार होण्यास मदत मुलांच्या लसीकरणानंतर कोरोनाचा धोका कमी कोरोना पसरण्याची शक्यता कमी संपर्कात येणाऱ्यांचा जीव वाचू शकतो

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या