Mumbai Drug Case: एनसीपीनंतर आता काँग्रेसकडून लाव रे तो VIDEO म्हणत मोठा गौप्यस्फोट
नागपूर, 2 ऑक्टोबर : मुंबईतील ड्रग्ज प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) हे एनसीबी, समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि भाजपवर आरोप करत असतानाच आता काँग्रेसने यात उडी घेतली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी पत्रकार परिषद घेत मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी (Mumbai Cruise drug case) आणि गुजरातमधील मुंद्रा पोर्टवर (mundra port) जप्त करण्यात आलेला ड्रग्जचा साठा यावरुन मोठा गौप्यस्फोट केला आहे. या पत्रकार परिषदेत अतुल लोंढे यांनी काही व्हिडीओज सुद्धा प्रसारित केले आहेत. तसेच भाजपवरही गंभीर आरोप केले आहेत. अतुल लोंढे म्हणाले, “माझा स्पष्ट आरोप आहे की, क्रूझ पार्टीच्या निमित्ताने देशात जो काही ड्रग्जचा साठा आला आहे या सर्वांशी भाजपचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या संबंध असल्याचं दिसत आहे. एकामागेएक जे काही पुरावे समोर येत आहेत त्यानुसार दिसत आहे की, यांच्या अधिकारात मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा व्यवहार सुरू आहे. एक इनोव्हा गाडी रविंद्र कदम यांच्या नावावर आहे. त्यांचा पत्ता कराडचा आहे. ही गाडी गुजरातला गेली होती. 21 सप्टेंबरला मुंद्रा पोर्ट येथे 3000 किलोंचं ड्रग्ज सापडले. मनिष भानुशाली गुजरातला 22 सप्टेंबरला पोहोचले. तेथील मंत्री किरीट राणा यांची भेट घेतली. एका वेब पोर्टाला मुलाखत देताना त्यांनी मुंद्राचा उल्लेख केला आणि तितक्यात त्यांचा माईक काढण्यात आला. "
अतुल लोंढे यांनी पुढे म्हटलं, मनिष भानुशाली यांनी 3 ऑक्टोबरला एक व्हिडीओ पोस्ट केला आहे त्यात तो म्हणतोय की, काम होगया, गाम हो गया. या सर्व प्रकरणात सॅम डिसोझा यांच्यात या गाडीतून 50 लाखांची देवाण घेवाण झाली अशी आमची माहिती आहे. हीच गाडी गुजरातला गेली आणि एनसीबी ऑफिसला गेली होती. रविंद्र कदम या सर्वातला मास्टरमाईंड आहे की त्याचा वापर झाला आहे. ही गाडी तिथपर्यंत कशी गेली. या रविंद्र कदम याला पकडलं तर सर्व गोष्टींची माहिती समोर येईल. “समीर वानखेडे मोदींहून पुढे गेले; 1 लाखांची पँट, 70 हजारांचा शर्ट, 20 लाखांचे घड्याळ” नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पुन्हा एकदा समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. समीर वानखेडे इतके प्रमाणिक अधिकारी आहे ती, त्यांचा पेहराव आणि राहणीमान जर पाहिलं तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदींहून (PM Narendra Modi) पुढे गेल्याचं नवाब मलिकांनी म्हटलं आहे. इतकच नाही तर समीर वानखेडे वापरत असलेले कपडे (expensive cloths), शूज (Shoes) अन् घड्याळ (watch) किती महाग आहेत याबाबतही नवाब मलिकांनी खुलासा करत खळबळजनक आरोप केला आहे. नवाब मलिक म्हणाले, तुम्ही समीर वानखेडेंचे सर्व फोटोज पाहा. शूज पाहा. दोन-दोन लाखांचे शूज वापरतात, शर्ट ज्याची किंमत 50 हजारांहून अधिक आहे असे शर्ट वापरतात. टी शर्ट तुम्ही पाहिले तर ज्याची किंमत 30 हजारांपासून सुरू होते. दररोज घड्याळ बदलतात मनगटावर लाखो रुपयांचे घड्याळ आहेत. 20 लाखांपासून 1 कोटी रुपयांचे घड्याळ आहेत. प्रामाणिक अधिकाऱ्याचे हे राहणीमान आहे. असं राहणीमान संपूर्ण देशातील नागरिकांचे व्हावे.