नागपूर, 06 ऑगस्ट : कोरोनाची (corona) लाट ओसरल्यामुळे सर्व बाजारपेठा सुरू करण्यात आला आहे. पण, आता ज्याची भिती व्यक्त केली जात होती, ती कोरोनाची तिसरी लाट (Third wave of corona) नागपूरमध्ये पाऊल टाकले आहे. कोरोनाबाधित (corona patients) रुग्णांची संख्या वाढल्यामुळे नागपूरमध्ये पुन्हा विकेंड लॉकडाऊन लावण्यात येणार आहे. नागपूरमध्ये पुन्हा तीन दिवसानंतर निर्बंध कडक करण्यात येणार आहे. नवीन निर्बंधानुसार, रेस्त्रारंट हे 8 वाजेपर्यंत सुरू असेल तर दुकानं 4 वाजेपर्यंत सुरू असणार आहे. सोबतच परत एकदा विकेंडला बाजरापेठेसाठी लॉकडाऊन सुरू करण्यात येणार आहे. सर्व संघटना सोबत चर्चा करून तीन दिवसांनंतर हे नियम लागू करण्यात येणार आहे. पत्नीने घटस्फोट देऊन थाटला नवा संसार; आता कुटुंबासाठी पतीकडून मागते मदत कोरोना संदर्भात जे आकडे समोर येत आहेत ते पाहता पुन्हा कडक निर्बंध लावण्याची गरज निर्माण झाली आहे. तिसऱ्या लाटेने नागपूर जिल्ह्यात पाऊल टाकले आहे. 78 बाधितांचे सॅम्पल जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले आहे, अशी माहिती नितीन राऊत यांनी दिली. IND vs ENG : धक्कादायक! रवी शास्त्रींनंतर टीम इंडियातल्या आणखी दोघांना कोरोना तिसऱ्या लाटेने जिल्ह्यात पदार्पण केले असल्याने हे निर्बंध लावावे लागणार आहे. येत्या दोन ते तीन दिवस चर्चा केल्यानंतर हे निर्बंध अमलात येतील, असंही राऊत यांनी सांगितलं. असे असतील निर्बंध हॉटेल रात्री 10 ऐवजी रात्री 8 वाजेपर्यंत दुकानं रात्री 10 ऐवजी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत बाजार weekend ( शनिवार व रविवारी ) ला बंद सर्वांशी चर्चा केल्यानंतर साधारणपणे तीन दिवसानंतर हे निर्बंध अंमलात आणले जातील. दुसऱ्या लाटेच्या अनुभवातून आम्ही शिकलो असून हे पाऊल उचलत आहोत. जेव्हा कोरोनाबाधित संख्या वाढू लागते तेव्हा नवीन लाटेची चाहूल होऊ लागते. नागपुरात तिसरी लाट दाखल झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या तीन ते चार दिवसात हे निर्बंध आम्ही लावू, असंही राऊतांनी स्पष्ट केलं.