JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / मुंबईत विकृताकडून तरुणीचा छळ; फोटो मॉर्फ करून सोशल मीडियावर बदनामी

मुंबईत विकृताकडून तरुणीचा छळ; फोटो मॉर्फ करून सोशल मीडियावर बदनामी

Crime in Mumbai: मुंबईतील एका तरुणानं एका युवतीचे फोटो मॉर्फ (viral morph photo ) करून तिला सोशल मीडियावर बदनाम केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी मुंबई, 17 सप्टेंबर: मुंबईतील एका तरुणानं एका युवतीचे फोटो मॉर्फ (viral morph photo ) करून तिला सोशल मीडियावर बदनाम केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीनं पीडित तरुणीचे सोशल मीडियावरील फोटोंचा गैरवापर करून ते फोटो अश्लील बनवले होते. त्यानंतर पीडितेच्या नावानं बनावटं खातं उघडून (Open fake account) त्यावर हे फोटो अपलोड (Upload morph photos) केले होते. पण हा विकृत प्रकार पीडितेच्या निदर्शनास आल्यानंतर तिने थेट पोलिसांत तक्रार (FIR lodged) दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तांत्रिक तपास करत आरोपी तरुणाला बेड्या ठोकल्या (Accused arrest) आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. अजय देवीलाल शिंगणे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अजयने सर्वप्रथम पीडित तरुणीचे सोशल मीडियावरील फोटो आपल्या मोबाइलमध्ये सेव्ह केले होते. त्यानंतर हे फोटो मॉर्फ करत ते अश्लील बनवले होते. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्यानं संबंधित अश्लील फोटो पीडितेच्या नावानं बनावट खातं उघडून त्यावर अपलोड केले होते. हेही वाचा- आधी तोंडात बोळा कोंबला मग..; प्रेमात अडसर ठरणाऱ्या मुलाला आईनं निर्दयीपणे संपवलं हा धक्कादायक प्रकार युवतीच्या लक्षात आल्यानंतर पीडितेनं थेट कळंबोली पोलीस ठाण्यात जाऊन अज्ञाताविरोधात फिर्याद दाखल केली होती. फिर्याद दाखल झाल्यानंतर कळंबोली पोलीस आणि सायबर पोलिसांनी समांतर तपास करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी तांत्रिक तपास केला असता, आरोपी अजयवर पोलिसांना संशय आला. याप्रकरणी पोलिसांनी अजयला ताब्यात घेऊन त्याच्या मोबाइल फोनची तपासणी केली असता, संबंधित प्रकार त्यानेच केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. हेही वाचा- संशयाने केला कुटुंबाचा सर्वनाश; पहाटे पत्नीचा दोरीनं आवळला गळा अन्… संबंधित विकृत प्रकार आरोपी अजय शिंगणे यानेच केल्याची त्यानं कबुली दिली आहे. पण त्यानं हा संतापजनक प्रकार का केला? याची माहिती अद्याप समोर आली नाही. या घटनेचा पुढील तपास कळंबोली पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या