JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / 'बायको लवकर घरी ये, भांडायला जायचंय', नकार दिल्याने चाकू भोकसून पत्नीचा खेळ खल्लास

'बायको लवकर घरी ये, भांडायला जायचंय', नकार दिल्याने चाकू भोकसून पत्नीचा खेळ खल्लास

Murder in Virar: विरार पूर्वेच्या फुलवाडा परिसरात एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील एका व्यक्तीने शेजाऱ्यांशी झालेल्या भांडणाचा राग आपल्या पत्नीवर काढला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

विरार, 28 सप्टेंबर: विरार पूर्वेच्या फुलवाडा परिसरात एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील एका व्यक्तीने शेजाऱ्यांशी झालेल्या भांडणाचा राग आपल्या पत्नीवर काढला आहे. शेजाऱ्याशी झालेल्या भांडणात पत्नीने सहभाग घेतला (wife did not participate in quarrel with neighbor) नाही, म्हणून आरोपीने आपल्या पत्नीची चाकूने भोकसून हत्या (husband stabbed wife with knife) केली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी पतीचा शोध सुरू केला आहे. जगदीश गुरव असं गुन्हा दाखल झालेल्या 35 वर्षीय आरोपी पतीचं नाव आहे. आरोपी जगदीश यांची पत्नी सुप्रिया (वय-25) या गेल्या आठवड्यात आपल्या माहेरी गेल्या होत्या. पत्नी माहेरी गेल्याने जगदीश घरी एकटाच होता. दरम्यान, कपडे सुकायला घालण्यावरून शेजाऱ्यांशी वाद झाला. या किरकोळ वादातून त्याची शेजाऱ्यांशी किरकोळ हाणामारी झाली. हेही वाचा- हृदयद्रावक: पत्नीचे हट्ट पुरवायला कमी पडला गरीब पती; विवाहितेनं उचललं भयावह पाऊल त्यामुळे आरोपीने तावातावात आपल्या पत्नीला फोन करत घटनेची माहिती दिली. तसेच ‘तू लवकर घरी ये, आपल्याला भांडायला जायचंय’ असं सांगितलं. पण माहेरी असलेल्या पत्नीने दोन-तीन दिवसात घरी येते, असं सांगत वाद न वाढवण्याचा सल्ला दिला. पण शेजाऱ्यांशी झालेल्या भांडणात पत्नीने साथ न दिल्याने आरोपी जगदीशला राग अनावर झाला. यामुळे तो थेट सासुरवाडीत गेला आणि पत्नीशीच वाद घालायला सुरुवात केली. दरम्यान भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या सासुलाही त्याने मारहाण केली. हेही वाचा- एकतर्फी प्रेमातून वर्गमित्राचं विकृत कृत्य; विवाहितेला किचनमध्ये डांबून ठेवलं अन यानंतर स्वयंपाकघरातील चाकू आणून आरोपीने पत्नीच्या छातीत सपासप वार केले. हा हल्ला इतका भयंकर होता की या दुर्दैवी घटनेत सुप्रिया यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपीनं घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी सासूने विरार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. अद्याप आरोपीला अटक करण्यात आली नसून घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या