मुंबई, 09 एप्रिल : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई शहर तर कोरोनाचं हॉटस्पॉट ठरत आहे. याआधी मुंबईत केवळ 4 हॉटस्पॉट होते. आता ही संख्या 8 झाली आहे. धारावी आणि वरळी या भागात कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण आढळून आले आहे. हॉटस्पॉट म्हणजे असे क्षेत्र जेथे सर्वात जास्त कोरोना आहेत. हे सर्व परिसर सील केले जातात. लोकांना बाहेर पडण्यास बंदी असते. या भागात राहणाऱ्या लोकांवर कोणत्या प्रकारचे निर्बंध लादले जातील आणि त्यांना काय करावे लागेल आणि काय करू नये यावर एक नजर टाकूया. वाचा- वरळीत सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळल्यानंतर हालचाली, क्वारन्टाइनसाठी मोठी व्यवस्था हॉटस्पॉट म्हणजे काय? असा परिसस जेथे कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण आढळून आले आहेत. अशा परिस्थितीत कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी अशा भागात पूर्णपणे सीलबंद केले आहे. हॉट स्पॉट्स अंतर्गत, परिसर, सोसायटी, अपार्टमेंट किंवा एखाद्या विशिष्ट रस्त्याचे भाग पूर्णपणे बंद आहेत. वाचा- कोरोना रुग्णांची संख्या 5 हजार होईपर्यंत भारतात मृतांचा आकडा आहे सगळ्यात जास्त हे आहेत मुंबईतील टॉप- 8 कोरोना हॉटस्पॉट जी दक्षिण : परळ एसटी डेपो, वरळी गाव, वरळी डेअरी परिसर, वरळी बीडीडी चाळ, गांधी नगर, महालक्ष्मी रेसकोर्स, नेहरु तारांगण, शांती नगर ई वॉर्ड : जीजामाता उद्यान, माझगांव, कस्तुरबा हॉस्पिटल, नायर हॉस्पिटल, जे.जे हॉस्पिटल के वेस्ट- के पश्चिम : ओशिवरा, वर्सोवा, अंबोली हिल, सात बंगला, मनिष नगर -भवन्स कॉलेज, विले पार्ले- मीठीबाई कॉलेज परिसर, गिल्बर्ट हिल डी : बेलासिस चाळ, वेलिंग्टन स्पोर्ट क्लब, प्रियदर्शीनी पार्क, कमला नेहरु पार्क, ऑपेरा हाऊस, खेतेवाडी के इस्ट- के पूर्व : जोगेश्वरी, गुंदवली, वेरावली, विजय नगर, सहार एअरपोर्ट, सहार व्हिलेज, चकाला, विले पार्ले टेलिफोन एक्सचेंज एच इस्ट : वांद्रे पूर्व, टिचर्स कॉलनी, गव्हर्नमेंट कॉलनी, भारत नगर, खेरवाडी, वांद्रे टर्मिनस, धारावी कॉलनी, सांताक्रुझ, युनिव्हर्सिटी कँपस पी नॉर्थ : पुष्पा पार्क, तानाजी नगर, लिबर्टी गार्डन, दिंडोशी, पिंपरी पाडा, मालाड ईस्टचा काही भाग एम वेस्ट : टिळक नगर, छेडा नगर, माहुल व्हिलेज परिसर वाचा- बऱ्या झालेल्या कोरोना रुग्णालाही क्वारंटाइन आवश्यक; घरी कशी घ्यावी काळजी? हॉटस्पॉट भागात काय करावे आणि काय करू नये > या परिसरातील बाहेर आणि आत येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. > कोणतेही दुकान उघडण्यास परवानगी नाही. अगदी मेडिकल स्टोअरही बंद आहे. > प्रत्येक महत्वाच्या वस्तूची होम डिलीव्हरी प्रशासनाकडून केली जाईल. > रुग्णवाहिका, अग्निशमन दलालादेखील प्रवेशासाठी परवानगी घ्यावी लागते. > हॉटस्पॉट भागात माध्यमांच्या प्रवेशावरही बंदी आहे. फक्त डॉक्टरांना जाण्याची परवानगी आहे पण तेही खास पासमधून. > संसर्गाची काही चिन्हे आहेत की नाही किंवा जर एखाद्या व्यक्तीने सकारात्मक रूग्णाच्या संपर्कात येत असेल तर ते शोधून काढले जाईल. संपादन-प्रियांका गावडे