JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस; या भागात रस्ते तुंबल्याने वाहतुकीवर परिणाम

मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस; या भागात रस्ते तुंबल्याने वाहतुकीवर परिणाम

मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे सखल भागात पाणी साचलं आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईतील सायन परिसरात पाणी साचलं आहे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 05 जुलै : गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह कोकणात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सोमवारी मध्यरात्रीनंतर मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस (Heavy rains in Mumbai) कोसळण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला होता. याप्रमाणेच या भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे सखल भागात पाणी साचलं आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईतील सायन परिसरात पाणी साचलं आहे (Waterlogging in Sion area of Mumbai). सावधान! राज्यात सर्वत्र दमदार पावसाचा इशारा; नागपूरपासून रत्नागिरीपर्यंत NDRF ची पथके तैनात रात्रभर मुंबईसह उपनगरात पावसाने चांगलच झोडपलं. त्यामुळे अनेक ठिकाणची वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. याशिवाय मुसळधार पावसामुळे शेकडो दुकानांत, घरात पाणी शिरलं आहे. सर्वत्र पाणीच पाणी साचलेलं पाहायला मिळत असून अनेक नागरिक अडकून पडले आहेत.

संबंधित बातम्या

दुसरीकडे गेल्या तीन दिवसापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील जगबुडी नदीने काल धोक्याची पातळी ओलांडली होती. रात्रभर मुसळधार पाऊस सुरू आहे. मात्र आज सकाळी नदीची पाण्याची पातळी एक मीटरने कमी झाल्यामुळे तूर्तास धोका टळलेला आहे. सध्याची जगबुडी नदीची पाण्याची पातळी 6.30 मीटर एवढी आहे Video: काही तासांच्या पावसामुळे मुंबईजवळ भयंकर दृश्य; पालिकेकडून दुर्लक्ष, नागरिक भयभीत दरम्यान, पुढील 4 दिवसांत मध्य भारत, पश्चिम किनारपट्टीवर मान्सून अधिक सक्रिय होण्याची स्थिती आहे. पश्चिम किनारपट्टीवरील जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. कमी दाबाचे क्षेत्र उत्तर ओडिशा व लगतच्या दक्षिण झारखंड भागात होऊ शकते. परिणामी महाराष्ट्रात येत्या 4 दिवसात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील चार-पाच दिवस मान्सून कोकणात अधिक सक्रिय होणार आहे. मुंबई ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरात येत्या 4 ते 5 दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या