JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / Ground Report: 'ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो...', वसई-विरारचं भीषण वास्तव

Ground Report: 'ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो...', वसई-विरारचं भीषण वास्तव

सोमवारपासून वसई-विरार परिसरातील ऑक्सिजनची (Oxygen Shortage in Vasai Virar) समस्या माध्यमांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. याठिकाणी असणाऱ्या खाजगी रुग्णालयातून ऑक्सिजनअभावाचं धक्कादायक वास्तव समोर येते आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वसई, 13 एप्रिल: सोमवारपासून वसई-विरार परिसरातील ऑक्सिजनची (Oxygen Shortage in Vasai Virar) समस्या माध्यमांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. सोमवारी एकाच दिवसात वसई-विरार परिसरात ग्रामीण आणि शहरी भागात एकूण 12 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. दरम्यान याठिकाणी असणाऱ्या काही रुग्णालयांनी मात्र ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. विरार-वसईमधून ऑक्सिजनअभावाची अशीच एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. विरार वसई भागांत ऑक्सिजनची इतकी वानवा की रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यासाठी सांगितलं जात आहे. याठिकाणी असणाऱ्या गोल्डन पार्क रुग्णालयात ऑक्सिजन नसल्याने रुग्ण हलवण्यासाठी सांगितलं जात आहे. रुग्णालयाचे मालक असलेल्या डॉक्टरांनी कलेक्टरना याबाबत माहिती दिली, मात्र त्यानंतर त्यांना केवळ 2 तासांसाठी ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यात आला. त्यानंतर काय असा सवाल डॉक्टरांकडून विचारला जात आहे. News 18 लोकमने याबाबत थेट ग्राउंड रिपोर्ट करत यामागचं वास्तव काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. (हे वाचा- 14 दिवसांच्या लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, आज-उद्या CM घोषणा करतील- बाळासाहेब थोरात ) या रुग्णालयातील मुख्य डॉ. माल्कम पेस्तनजी यांनी पोलिसांना पत्र लिहून असे कळवले आहे की जर ऑक्सिजन अभावी त्यांच्या रुग्णालयामध्ये रुग्णांचा मृत्यू झाल्यास संरक्षण देण्यात यावी. अशाप्रकारे त्यांनी पोलिसांकडे संरक्षण देण्याची मागणी केली आहे. पालिकेकडे ऑक्सिजन सिलेंडरबाबत मागणी केली असता पालिकेकडून 10 सिलेंडरचं आश्वासन देण्यात आलं, पण गोल्डन पार्क रुग्णालयामध्ये केवळ 4 सिलेंडर देण्यात आले. हे सिलेंडर देखील चढ्या दराने दिल्याचा आरोप याठिकाणच्या डॉक्टरांकडून केला जात आहे. 200 रुपयांऐवजी त्यांना 800 रुपयांना हे सिलेंडर देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. संबंधित रुग्णालयातील मुख्य डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार परवा हे दर 400, त्यानंतर 600 आणि आता 800 अशा वेगवेगळ्या दराने देण्यात आले आहेत. पोलीस संरक्षण देण्याची डॉक्टरांची मागणी

पोलीस संरक्षण देण्याची डॉक्टरांची मागणी

(हे वाचा- अनोख्या मायक्रोचिपचा शोध, रक्तातून फिल्टर करुन बाहेर काढणार कोरोना विषाणू ) दरम्यान 50 बेड असलेल्या या रुग्णालयात 74 रुग्ण दाखल करण्यात आले आहेत आणि रोज ऑक्सिजनअभावी  20 ते 22 रुग्णांना परत पाठवलं जात असल्याची धक्कादायक माहिती समोर येते आहे. डायनिंग हॉल, कॉन्फरन्स हॉल याठिकाणी रुग्णांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णालयातील मुख्य डॉक्टर माल्कम पेस्तनजी यांनी अशी माहिती दिली की गेले चार दिवस ऑक्सिजनची फार कमतरता आहे. दिवसाला या रुग्णालयामध्ये 100 सिलेंडरची आवश्यकता आहे, पण जेमतेम 10-12 सिलेंडर उपलब्ध होत आहेत. सिलेंडर मिळवण्यासाठी सर्व पुरवाठादारांकडे त्यांची गाडी रात्रभर फिरत होती, परंतू त्यांना सिलेंडर उपलब्ध झाले नाहीत. त्यांनी एक धक्कादायक माहिती दिली की, दोन दिवसापूर्वी या डॉक्टरांनी त्यांच्या एका डॉक्टर मित्राला न सांगता त्याच्या गाडीतील ऑक्सिजनचा सिलेंडर चोरला आणि त्यामुळे त्यांना नंतर माफीही मागावी लागली. इतकी भीषण परिस्थिती मुंबईलगतच असणाऱ्या या परिसरात पाहायला मिळते आहे. त्यांनी काहीच खात्री नसल्याने सर्व पेशंट्सना रुग्णालयातून शिफ्ट होण्याचं आवाहन देखील केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या