मुंबई, 30 जानेवारी : संपूर्ण भारतीय बनवावटीची आणि दोन प्रमुख शहरांमधील अंतर कमी कालावधीमध्ये पूर्ण करणारी रेल्वे म्हणून वंदे भारत एक्स्प्रेसनं कमी कालावधीमध्येच लोकप्रियता मिळवली आहे. गेल्या काही दिवसांपासून या रेल्वेचा विस्तार देखील वाढतोय. त्याचवेळी यामधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा एक लाजिरवाणा फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झालाय. हा फोटो व्हायरल होताच केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी महत्त्वाच्या निर्णयाची घोषणा केलीय. काय आहे प्रकरण? ‘वंदे भारत’ मध्ये कवच’ तंत्रज्ञान (ट्रेन कोलिजन अव्हॉइडन्स सिस्टीम) आहे. ही एक स्वयंचलित सुरक्षा प्रणाली असून ही प्रणाली दोन गाड्यांची टक्कर होण्यापासून रोखते. विशेष म्हणजे हे तंत्रज्ञान भारतातच विकसित करण्यात आलं असून परदेशातून आयात होणाऱ्या ट्रेनच्या तुलनेत कमी खर्चात बनवलं जातं. या एक्स्प्रेसचा वेग हा शताब्दीपेक्षा जास्त आहे. Vande Bharat Express : मुंबईतील ‘या’ स्टेशनवरही थांबणार वंदे भारत एक्स्प्रेस, वाचा नवे वेळापत्रक ‘वंदे भारत’ मधील अस्वच्छतेचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. आयएएस अधिकाऱ्यानंही तो व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये प्रवाशांनी फेकलेल्या बॉटल्स, खाण्याचे डबे, पॉलिथीन बॅग दिसत असून एक सफाई कर्मचारी ती सर्व घाण साफ करताना दिसत आहे.
रेल्वेमंत्र्यांची घोषणा रेल्वे मंत्री वैष्णव यांनी या सर्व प्रकाराची दखल घेतलीय. त्यांनी ‘वंदे भारत’ मधील स्वच्छतेची व्यवस्था बदलण्यात आलीय. त्यासाठी तुमचे सहकार्य अपेक्षित आहे,’ असं आवाहन प्रवाशांना केलंय.
‘वंदे भारत’ मध्ये आता विमानातील स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. त्यानुसार प्रवाशांना गंतव्य स्थानी पोहचण्यापूर्वी आपल्या आजूबाजूचा सर्व कचरा जमा करून तो स्वच्छता कर्मचाऱ्यांना द्यावा लागेल. रेल्वे मंत्र्यांच्या या निर्णयाचं सोशल मीडियावर अनेकांनी स्वागत केलंय. या निर्णयामुळे ‘वंदे भारत’ स्वच्छ राहण्यास मदत होईल अशी त्यांना आशा आहे.