धनंजय दळवी, प्रतिनिधी मुंबई, 10 फेब्रुवारी : फेब्रुवारीचा दुसरा आठवडा म्हणजे प्रेम स्वीकार आणि अभिव्यक्तीचा महिना. या दिवसांमध्ये रोझ डे ते व्हॅलेंटाईन डे पर्यंत तुमच्याकडे तुमचे प्रेमप्रकरण पुढे नेण्याच्या अनेक संधी आणि मार्ग आहेत. या दिवसामध्ये तुम्ही तुमच्या जोडीदाराला खूश करण्यासाठी तुमच्या आवडीची भेटवस्तू देऊ शकता. ज्यामध्ये टेडी बेअर ही सर्वात खास भेट आहे. जी तुमचा पार्टनर तिच्या मनाच्या जवळ ठेवेल. यासाठी तुम्हाला मुंबई तील स्वस्त दरात टेडी बेअर मिळणाऱ्या मार्केटबद्दल सांगणार आहोत. काय किंमत? तुम्हाला टेडी बेअर गिफ्ट करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या लव्ह पार्टनरच्या मूडची तर काळजी घ्यावी लागेलच. शिवाय त्याच्या आवडी-निवडीचीही विशेष काळजी घ्यावी लागेल. मुंबईतील प्रसिध्द अश्या क्रॉफेड मार्केट परिसरात अशी अनेक दुकान आहेत जिथे स्वस्त दरात टेडी बेअर मिळतात. अगदी वेगवेगळ्या रंगाचे टेडी बेअर तुम्हाला इथे पाहायला मिळतील. तर काही इंचापासून ते काही फुटांपर्यंत हे टेडी बिअर इथे स्वस्त दरात उपलब्ध होतात. अवघ्या 50 रुपयांपासून 8 हजार रूपये किंमती पर्यंत इथे टेडी बेअर मिळतात.
Teddy Day 2022 : प्रत्येक रंगाच्या टेडी बेअरचे आहे विशेष महत्व! गिफ्ट करण्यापूर्वी हे नक्की वाचामुंबईतील प्रसिध्द असलेला हा क्रॉफीट मार्केटचा परिसर आहे. व्हॅलेंटाईन डे जवळ आलेला आहे आणि अशातच जर तुम्हाला स्वस्त दरात टेडी बेअर हवे असतील तर तुम्हाला आमच्या इथे मिळतील. माझे वडील गेल्या 20 वर्षांपासून याच परिसरात हा व्यवसाय करत आहेत आणि सध्या हा व्यवसाय सांभाळण्याचं काम मी करत आहे. हे मार्केट होलसेल मार्केट असल्यामुळे या बाजारात लोकांची वरदळ पाहायला मिळते. आमच्याकडे कपल टेडी बेअर सुध्दा मिळतात. तुम्हाला जर टेडी बेअर हवा असेल तर तुम्ही याठिकाणी येऊन खात्री करून घेऊन जाऊ शकतात, असं दुकानदार चौधरी जान मोहम्मद यांनी सांगितले.
गुगल मॅपवरून साभार