JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / ‘कोरोना’विरुद्धच्या लढाईत भारताच्या या कंपनीचा पुढाकार, अमेरिकेने मानले आभार

‘कोरोना’विरुद्धच्या लढाईत भारताच्या या कंपनीचा पुढाकार, अमेरिकेने मानले आभार

डॉक्टर्स आणि मेडिकल स्टाफला लागणाऱ्या सुरक्षा साधनांचं उत्पादन ही भारतीय कंपनी अमेरिकेत करत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 20 एप्रिल: जगातला सर्वात शक्तिशाली देश असणाऱ्या अमेरिकेत कोरोनाने थैमान घातलं आहे. जगात सर्वात जास्त फटका अमेरिकेला बसला आहे. आर्थिक नुकसान किती झालं याचा अजुन अंदाजही येत नाही. सगळा देश कोरोनाविरुद्ध लढत आहे. रुग्णांची संख्या प्रचंड असल्याने डॉक्टर्स आणि इतर लोकांना लागणाऱ्या साधनांची कमतरता आहे. त्यामुळे तिथल्या अनेक कंन्यांनी एक मोहिम सुरू केली आहे. त्या मोहिमेत भारताच्या महिंद्रा कंपनीनेही आपलं योगदान दिलंय. महिंद्राच्या डेट्रॉइट इथल्या प्रकल्पामध्ये मास्क, सुरक्षा शिल्ड आणि सेफ्टी बॉक्सचं उत्पादन करण्यात येत आहे. महिंद्रा कंपनीच्या या पुढाकाराबद्दल अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी महिंद्रा कंपनीचे आभार मानले आहेत. महिंद्रा कंपनीचा अमेरिकेतल्या Auburn या शहरात प्लाँट आहे. त्या प्लाँटमध्ये कोरोनासाठी लागणाऱ्या विविध वैद्यकीय साधनांची निर्मिती करण्यात येत आहे. यात चेहरा झाकणारं फेस शिल्ड, गाड्यांचं सुरक्षा कव्हर, कोरोना रुग्णांचा चेहेरा कव्हर करणारा बॉक्स आणि मास्क तयार करण्यात येत आहेत. तिथल्या The Detroit News ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. त्याच वृत्ताचा हवाला देत परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी महिंद्रा कंपनीचे आभार मानले आहेत.

संबंधित बातम्या

जगभर हाहाकार माजवलेल्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत जवळपास 1 लाख 60 हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. चीनमधून याचा प्रादुर्भाव जगभर झाला. यामुळे अमेरिकेनं चीननेच कोरोना तयार केल्याचा दावाही केला आहे. दरम्यान, वुहानमधील लॅबने हे सर्व आरोप पहिल्यांदाच फेटाळून लावले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या आरोपांनासुद्धा फेटाळलं आहे. ट्रम्प यांनी आरोप केला होता की, हा धोकादायक व्हायरस जगभर पसरण्यास चीनच्या लॅबमधूनच सुरूवात झाली होती. अमेरिकेसह अनेक देशांनी चीनवर कोरोनाबाबत आरोप केले आहेत.

लसीच्या आशेवर राहू नका, कोरोनाच्या दहशतीत जगावं लागेल; WHO ने केलं सावध

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं की,‘कोरोना व्हायरस वुहानमधील एका लॅबमधून निघाला आणि जगभर पसरला.’ गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात वुहानमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळला होता. त्यानंतर असं म्हटलं जात होतं की, हा व्हायरस वुहानमधील WIV किंवा हुआननानच्या सीफूड मार्केटमधून पसरला आहे. WIV आणि त्यांची खास अशी पी4 लॅब अशा धोकादायक व्हायरसना जतन करण्यास सक्षम आहे. दरम्यान, याबाबत फेब्रुवारीत लॅबने कोरोनाबाबतच्या अफवा फेटाळून लावल्या होत्या.

‘उन्हात नष्ट होतो कोरोना’, प्रयोग अंतिम टप्प्यात असल्याचा अमेरिकेचा दावा

वुहानच्या लॅबचे संचालक युआन झिमिंग यांनी म्हटलं होतं की, त्यांची लॅब कोरोनाचा स्रोत नाही. सर्व अफवा आहेत. आम्हाला माहिती आहे या लॅबमध्ये कोणत्या प्रकारचं संशोधन होतं आणि इथं व्हायरस, नमुने कसे जतन केले जातात. व्हायरस लॅबमधून आला का हा प्रश्नच उरत नाही असंही ते म्हणाले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या