मुंबई, 14 मार्च : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील पादचारी पूल कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत 15- 20 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये झाहीद खान (वय 32), तपेंद्र सिंग (वय 35), अपूर्वा प्रभू (वय 35 ), रंजना तांबे (वय 40) आणि सारिका कुलकर्णी ( वय 35) यांचा समावेश आहे. जखमींना जे.जे. रुग्णालय, गोकुळदास तेजपाल रुग्णालय आणि सेंट जाॅर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सीएसएमटीकडून टाईम्स आॅफ इंडियाकडे जाणाऱ्या पादचारी पुलाचा काही भाग संध्याकाळी 7.30 च्या सुमारास कोसळला. या भागात संध्याकाळी अतिशय गर्दी असते. महत्त्वाची ऑफिसेस या भागात असल्याने सगळ्यांची गर्दी ही सीएसएमटी स्टेशनकडे असते. हा पूल कोसळल्यामुळे प्रचंड धावपळ उडाली. पुलाखाली काही गाड्याही दबल्या गेल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पालिका प्रशासन, अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या टीमने धाव घेतली. जखमींना तात्काळ जे.जे. रुग्णालय, गोकुळदास तेजपाल रुग्णालय आणि सेंट जाॅर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अजूनही दोघांची प्रकृती गंभीर आहे. PHOTOS थरार….असा कोसळला CSMT जवळचा पूल …आणि पुलावरचे लोक खाली कोसळले मुंबईत पूल कोसळला, घटनास्थळावरचा VIDEO अपूर्वा प्रभू (वय 35 ) आणि रंजना तांबे (वय 40) या दोघी सीएसटीजवळच्या जीटी हॉस्पिटलमध्ये नर्स होत्या आणि रात्रपाळीसाठी कामावर रुजू होण्यासाठी जात होत्या, अशी माहिती पुढे आली.
मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत घटनेनंतर एका पाठोपाठ एक राजकारणी आणि मंत्री घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक आमदार, खासदार, मुंबईचे महापौर सीएसएमटीजवळ आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही घटनास्थळी भेट दिली आणि रुग्णालयात जखमींची विचारपूस केली. घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत सरकारतर्फे जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर जखमींना 50,000 रुपयांची मदत दिली जाणार आहे. ===================== मुंबईच्या CSMT जवळील पादचारी पूल अपघाताचा पहिला VIDEO