मुंबई, 31 मे : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहे. परमबीर सिंग यांच्या इशाऱ्यावरूनच बडतर्फ पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin waje) याने खंडणी वसुली करत होता, असा गंभीर आरोप प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाब्रिया (Dilip Chhabria) यांनी केला आहे. याबद्दल छाब्रिया (Dilip Chhabria) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackerey) यांना पत्र लिहिले आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात प्रसिद्ध कार डिझायनर असलेले डीसी डिझाइनचे संस्थापक दिलीप छाब्रिया (Dilip Chhabria) यांना फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आली होती. जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे, असं वृत्त टीव्ही 9 मराठी ने दिले आहे. सुशील कुमारच्या अडचणीत भर, दिल्लीच्या व्यापाऱ्याने केला गंभीर आरोप परमबीर सिंग यांच्या आदेशानुसारच सचिन वाझे, रियाझ काझी हे दोघे पोलीस अधिकारी खंडणी गोळा करत होते. माझ्याविरोधात आणि माझी कंपनी डीसीपीडीएलमध्ये भागीदार असलेल्या किरण कुमार, इंदरमल रामाणी यांच्याविरोधात परमबीर सिंग यांच्या इशाऱ्यावरूनच खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते. खोटे गुन्हे दाखल करून 25 कोटींची मागणी केली होती, जर पैसे दिले नाही तर आणखी 15 गुन्हे दाखल केले जातील, अशी धमकी दिल्याचा दावा या पत्रात छाब्रिया यांनी केला आहे. त्याचबरोबर, सचिन वाझे, रियाज काझी हे परमबीर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी गोळा करत होते. सीआययू युनिटच्या अंतर्गत तपास करण्यात आलेल्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणीही छाब्रिया यांनी केली. सट्टेबाजानेही केला होता 10 कोटी खंडणीचा आरोप परमबीर सिंग यांच्यावर आरोप होण्याची ही पहिली घटना नाही. याआधीही निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनीही परमबीर सिंग यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तसंच क्रिकेट सट्टेबाज सोनू जालान यानं हे आरोप केलेत. सोनूनं स्वतः गुन्हे अन्वेषण विभाग (CID) कडे जाऊन आपला जबाब नोंदवला. एखाद्या मोठ्या प्रकरणात जर अटक टाळण्याची असेल तर माजी पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना 10 कोटी रुपये दे, असं परमबीर सिंग यांनी मला सांगितलं होतं. जालानं यानं परमबीर सिंग, प्रदीप शर्मा आणि पोलीस निरीक्षक राजकुमार यांच्यावर वसुलीचे आरोप केलेत. या आरोपांची सध्या सीआयडी चौकशी करत आहेत.