JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / तृतीयपंथीयांचा मोर्चा घुसला थेट मुंबई भाजप कार्यालयात, VIDEO समोर, नेमकं प्रकरण काय?

तृतीयपंथीयांचा मोर्चा घुसला थेट मुंबई भाजप कार्यालयात, VIDEO समोर, नेमकं प्रकरण काय?

भाजपच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयाबाहेर आज संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास एक अनपेक्षित घटना घडताना दिसली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

विनोद राठोड, प्रतिनिधी मुंबई, 17 जून : भाजपच्या (BJP) मुंबई येथील मुख्य कार्यालयाबाहेर आज संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास एक अनपेक्षित घटना घडताना दिसली. काही तृतीयपंथीयांनी आज घोषणाबाजी करत थेट भाजप कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी परिसरात मोठा गोंधळ उडाला. तृतीयपंथीयांनी टाळ्या वाजवत जोरदार घोषणाबाजी केली. तृतीयपंथीयांचं हे आंदोलन काही काळ चाललं. त्यानंतर पोलिसांनी या तृतीयपंथीयांना ताब्यात घेतलं. तृतीयपंथीयांनी भाजप कार्यालयावर मोर्चा का काढला? तृतीयपंथी यांच्या भाजप कार्यालयावरील मोर्चामागे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ईडी (Rahul Gandhi ED Inquiry)  चौकशी आहे. राहुल गांधी यांची ईडीकडून सलग तीन दिवस चौकशी करण्यात आली. ईडीच्या या कारवाईवरुन संतप्त झालेल्या तृतीयपंथीयांनी थेट भाजप कार्यालयावर मोर्चा काढला. महिला काँग्रेसचा मुंबईतील ED कार्यालयावरील मोर्चाचा फियास्को काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना नॅशनल हेराल्ड (Nationa Herald) प्रकरणी ईडीने (ED) समन्स बजावला आहे. पण त्यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दुसरीकडे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची नॅशनल हेराल्ड प्रकरणी सलग तीन दिवस 30 तास चर्चा करण्यात आली. राहुल गांधी यांच्या ईडी चौकशीवरुन काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. ईडीच्या या चौकशीवरुन देशात ठिकठिकाणी आंदोलन (Protest) केले जात आहे. देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून राहुल गांधींच्या ईडी चौकशीला विरोध करण्यात येतोय. देशभरात आंदोलन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांप्रमाणे मुंबईतीलही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी तर ईडीवर (ED) मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. या मोर्चाचा प्रचंड गाजावाजा करण्यात आला होता. पण काँग्रेसचे ईडीवरील आक्रमक मोर्चाचे सर्व दावे फोल ठरले. महिला काँग्रेसचा ईडीवरील मोर्चाचा फियास्को झाला. ( मुंबईपाठोपाठ पुणे कोरोनाच्या विळख्यात! रोजची संख्या 200 वर गेली तरी पुणेकर अनभिज्ञ? ) राहुल गांधी यांच्या ईडी चौकशीला विरोध करण्यासाठी मुंबईत महिला काँग्रेसचा आज दुपारी दोन वाजता ईडी कार्यालयावर मोठा मोर्चा निघणार होता. या मोर्चाचा प्रचंड गाजावाजा करण्यात आला होता. या मोर्चाचा गाजावाजा पाहता पोलीसही सतर्क झाले होते. त्यामुळे मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ईडी कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पण मोर्चाचा ठरवलेला वेळे निघून 2 तास झाले तरी महिला जमेनात. मोर्चाच्या ठिकाणी आंदोलकांपेक्षा पोलीस आणि पत्रकारांची संख्याच जास्त होती. विशेष म्हणजे या मोर्चाकडे काँग्रेसच्या सर्व मोठ्या नेत्यांनी पाठ फिरवलेली दिसली. काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांपैकी एकही नेता या आंदोलनात सहभागी झालेलं दिसलं नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या