JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / आज शेवटचा दिवस, उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुखपदाचं काय? शिवसेना काय घेणार निर्णय?

आज शेवटचा दिवस, उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुखपदाचं काय? शिवसेना काय घेणार निर्णय?

उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाची मुदत 23 जानेवारीला संपणार आहे, त्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जाहिरात

उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाची मुदत 23 जानेवारीला संपणार आहे, त्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 जानेवारी : आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी केली जात आहे. पण, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाचं काय होणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाची मुदत 23 जानेवारीला संपणार आहे, त्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कुणाचा याबाबतची पुढची सुनावणी 30 जानेवारीला होणार आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाची मुदत त्याआधी म्हणजेच 23 जानेवारीला संपत आहे. पक्षांतर्गत प्रक्रियेसाठी संमती द्या किंवा मुदतवाढ द्या असं ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला सांगितलं होतं. मात्र त्यावरही निर्णय झालेला नाही. त्यामुळे 23 जानेवारीला मुदत संपल्यानंतर नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आज उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार हे पाहण्याचे ठरणार आहे. (…म्हणून त्यांना पोटशूळ उठला; बाळासाहेबांच्या तैलचित्रावरून सत्तारांचा आदित्य ठाकरेंवर जोरदार पलटवार) १७ नोव्हेंबर २०१२ या दिवशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं. त्यानंतर शिवसेनाप्रमुख या पदावर कुठलीही नियुक्ती झाली नाही. शिवसेनाप्रमुख एकच होते बाळासाहेब ठाकरे आणि तेच राहतील अशी भावनिक भूमिका त्यावेळी शिवसेनेनं घेतली. त्यानंतर 2013 मध्ये उद्धव ठाकरे यांची निवड शिवसेना पक्षप्रमुख म्हणून केली गेली. २३ जानेवारी २०१८ या दिवशी पुन्हा एकदा पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंचीच निवड झाली. (राज ठाकरेंचा ‘तो’ खास व्हिडीओ पोस्ट करत मनसेकडून बाळासाहेबांना अभिवादन; जुन्या आठवणींना उजाळा) नेमकं या गोष्टीवर शिंदे गटाने बोट ठेवलं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेना पक्षप्रमुख हे पद उद्धव ठाकरेंनी तयार केलं आहे ते घटनाबाह्य आहे असा दावा मागच्या सुनावणीच्या वेळी शिंदे गटाच्या वकिलांनी केला होता. त्यामुळे आता निवडणूक आयोगाची सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. आता उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाचं काय होणार? असा सवाल उपस्थितीत झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या