मुंबई, 27 ऑक्टोबर : मुंबईतील एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (NCB zonal director Sameer Wankhede) यांनी काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांत (Mumbai Police) एक तक्रार दाखल केली होती. दोन पोलीस कर्मचाऱ्यांकडून आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचं समीर वनाखेडे यांनी म्हटलं होतं. या संदर्भातील सुसीटीव्ही फुटेजही समीर वानखेडे यांनी मुंबई पोलिसांकडे सुपूर्त केले होते. यावर आता मुंबई पोलिसांनी स्पष्टीकरण देत खुलासा केला आहे. (Mumbai Police said there is no truth in complaint lodged by Sameer Wankhede) मुंबईतील क्रूझवर ड्रग्ज पार्टीवर समीर वानखेडे यांनी कारवाई केली. या कारवाईत बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली आहे. आर्यन खानला करण्यात आलेली अटक तसेच एनसीबीच्या कारवाईवरुन मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांवरुन समीर वानखेडे हे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. त्यातच त्यांच्यावर पाळत ठेवण्याचा आरोप करण्यात आला होता. एनसीबीचे उपमहासंचालक मुथा अशोक जैन यांनी राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांची भेट घेत समीर वानखेडेंकडून तक्रारही दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी आता मुंबई पोलिसांची प्रतिक्रिया आली आहे. वाचा : समीर वानखेडेंचा नवा फोटो ट्विट करत नवाब मलिकांनी दिला सूचक इशारा एएनआय न्यूज एजन्सीने ट्विट करत म्हटलं, एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर ओशिवरा पोलिसांच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांकडून पाळत ठेवण्यात आल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, या तक्रारीत तथ्य नाहीये. ओशिवरा पोलीस स्टेशनचे ते दोन पोलीस कर्मचारी हे ओशिवरा स्मशानभूमीत वाहन चोरीच्या प्रकरणाच्या संदर्भातील सीसीटीव्ही फूटेज गोळा करण्यासाठी गेले होते अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
वानखेडेंनी व्यक्त केला होता पाळत ठेवल्याचा संशय काही दिवसांपूर्वी मुंबईचे NCB झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर आरोप केला होता की, आपल्यावर पाळत ठेवण्यात येत आहे. या प्रकरणात समीर यांनी महाराष्ट्राचे DGP यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. याशिवाय त्यांनी काही पुरावे देखील सादर केले होते. ओशिवरा पोलिसांनी स्मशानात जाऊन समीन वानखेडे यांचे CCTV फुटेज घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. 2015 मध्ये समीन वानखेडे यांच्या आईचं निधन झालं. तेव्हापासून दररोज समीर वानखेडे स्मशानात जाऊन आईचं दर्शन घेतात. त्यांचं सीसीटीव्ही फुटेज कुठल्या हेतूने घेण्यात आलं आहे, याबद्दल सवाल उपस्थित केला जात होता. दुसरी धक्कादायक बाब म्हणजे एका राजकीय नेत्याच्या मुलीनेही स्मशानभूमीतून वानखेडे यांचे सीसीटीव्ही फुटेज घेतल्याचं म्हटलं जात होतं. पण आता यावर मुंबई पोलिसांनी आपलं स्पष्टीकरण दिलं आहे.