JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / आता 26 जानेवारीपासून शाळेत वाचली जाणार राज्यघटनेची उद्देशपत्रिका

आता 26 जानेवारीपासून शाळेत वाचली जाणार राज्यघटनेची उद्देशपत्रिका

भारताची राज्यघटना ही जगात सर्वश्रेष्ठ समजण्यात येते. जनतेच्या सर्व आशा आकांक्षांचं प्रतिबिंब या उद्देशपत्रिकेत उमटलेलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 21 जानेवारी : राज्यघटना आणि त्यातल्या मुल्यांप्रती मुलांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. 26 जानेवारीपासून राज्यातल्या प्रत्येक शाळेत राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेचं वाचन केलं जाणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिलीय. शाळेत प्रतिज्ञा झाल्यानंतर ही उद्देशपत्रिका वाचली जाणार आहे. उद्देशपत्रिका ही राज्यघटनेचा आत्मा समजला जातो. सर्व राज्यघटनेचं सार हे या उद्देशपत्रिकेत आहे. त्यामुळे ही उद्देशपत्रिकेला सर्वात महत्त्व दिलं जातं. 22 जानेवारी 1947ला घटनासमितीने उद्देशपत्रिकेला मान्यता दिली तर 26 नोव्हेंबर 1949 ला उद्देशपत्रिका घटनेला जोडण्यात आली. घटनाकारांनी घटना ही भारतीय लोकांना अर्पण केली आहे. सार्वभौमत्त्व, प्रजासत्ताक, समता, स्वातंत्र्य, बंधुता, धर्मनिरपेक्षता, समाजवादी, न्याय अशा सगळ्या महत्त्वाच्या तत्वांचा या उद्देशपत्रिकेत समावेश करण्यात आला आहे. ‘पाथरी’च जन्मस्थान, सिद्ध झालं नाही तर राजीनाम्याची शिवसेना खासदाराची प्रतिज्ञा भारताची राज्यघटना ही जगात सर्वश्रेष्ठ समजण्यात येते. जनतेच्या सर्व आशा आकांक्षांचं प्रतिबिंब या उद्देशपत्रिकेत उमटलेलं आहे असं समजलं जातं. राज्यातल्या सर्व शाळांमध्ये या उद्देशपत्रिकेचं वाचन करण्यासाठी शिक्षण विभाग आदेशही काढणार आहे.

‘फक्त मुस्लिमांच्या आग्रहामुळे काॅंग्रेस शिवसेनेसोबत सत्तेत’

अशा प्रकारचं वाचन व्हावं अशी मागणी अनेक सामाजिक संघटनांनी केली होती. राज्यघटनेची उद्देशपत्रिका जर सगळ्यांना कळली तर अनेक सामाजिक प्रश्न सुटण्यास मदत होईल आणि अनेक प्रश्नही सुटतील अशी आशा शिक्षणमंत्री गायकवाड यांनी व्यक्त केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या