मुंबई, 25 एप्रिल : मॉल्स आणि मोठे कॉम्प्लेक्स वगळता दुकानांना आजपासून सुरू करण्याची परवानगी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात आली आहे. ही सवलत देत असताना केंद्र सरकारनं काही नियमावली जाहीर केली आहे. या नियम आणि अटींची पूर्तता न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. देशभरात ही परवानगी दिली असली तरीही महाराष्ट्रात राज्य सरकारकडून आणि मुंबईत महानगरपालिकेकडून जोपर्यंत हा निर्णय दुकानदारांना येत नाही तोपर्यंत दुकानं उघडण्याची घाई करू नये असं आवाहन फेरडेश ऑफ रिअल ट्रेडर्स वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष वीरेन शाह यांनी सांगितलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 3 मेपर्यंत हा लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. याचं पालन कटेकोरपणे करण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे. 20 एप्रिल रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील जिल्ह्यांना अंतर्गत व्यवहार आणि काही नियम शिथिल करण्याची परवानगी दिली होती. केंद्र सरकारनं जो आदेश जारी केला आहे. याची अंमलबजावणी हॉटस्पॉट वगळता देशभरात करण्यात येणार आहे. पण तरीही मुंबई आणि महाराष्ट्रात राज्य सरकारकडून निर्णय आल्याशिवाय दुकानं उघडू नयेत असं आवाहन करण्यात आलं आहे. मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा 4 हजार पार तर राज्यात जवळपास 6 हजार आहे. दुकानदारांनी येणाऱ्या माहिती किंवा सोशल मीडियावर फिरणाऱ्या पोस्टकडे दुर्लक्ष करावे. महानगरपालिकेकडून जोपर्यंत दुकानं उघडण्याबाबत कोणताही निर्णय येत नाही तोपर्यंत आपण दुकानं उघडू नयेत. असं आवाहन वीरेन शाह यांनी केलं आहे. हे वाचा- लॉकडाऊन 2.0 : दारूची दुकानं आजपासून उघडणार? जाणून घ्या सरकारचा निर्णय
काय आहे गृहमंत्रालयाचा आदेश शुक्रवारी रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार काही नियमावली घालून देण्यात आली आहे. या नियमांचं पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. केंद्र सरकारनं जारी केलेल्या आदेशानुसार काही अटी घालण्यात आल्या आहेत. या अटींची पूर्तता न केल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. दुकानांनमध्ये केवळ 50 टक्के कर्मचारीच काम करू शकतात. दुकानदारांनी मास्क आणि हॅण्डग्लोज वापरायला हवेत. यासोबत सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं आवश्यक आहे. केंद्र सरकारनं जारी केलेल्या आदेशामध्ये हॉटस्पॉमधील दुकानं, मॉल्ससाठी हा आदेश लागू होणार नाही असाही सांगण्यात आलं आहे. हे वाचा- तबलिगी जमात तयार करतं रूह अफजा? काय आहे व्हायरल मेसेज मागचे सत्य संपादन- क्रांती कानेटकर