मुंबई, 11 जानेवारी : उत्तर प्रदेश निवडणुकीच्या रणधुमाळी सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीने सुद्धा उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. योगी आदित्यनाथ (yogi adityanath) यांनी काही दिवसांपूर्वी मुस्लिमांची घरं जाळण्याबद्दल भाष्य केलं होतं. ‘एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अशी भाषा वापरणे हे त्यांना शोभत नाही’, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली. उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेपूर्वी उत्तरप्रदेशातील काँग्रेस अल्पसंख्यांक चेहरा म्हणून ओळख असलेले सिराज मेहंदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सिराज मेहंदी सोबत 13 आमदार राष्ट्रवादीत येणार आहेत. स्वामीप्रसाद मौर्य यांनी भाजपला रामराम केला त्यांच्यापासून सुरुवात झाली. यावेळी बोलत असताना शरद पवार यांनी योगी आदित्यनाथ आणि भाजपवर टीकास्त्र सोडले. ‘उत्तर प्रदेशात परिवर्तनाची आवश्यकता आहे. याकरिता सिराज मेहंदी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला आहे. येत्या दिवसात त्यांचे अनेक साथीदार राष्ट्रवादीत येणार आहे. उत्तर प्रदेशात संप्रदायाचे विचार रुजवले जात आहे. अशी भाषा स्वतः मुख्यमंत्री करता. 80 टक्के आमच्याकडे,अशी भाषा त्यांना शोभत नाही, असं म्हणत शरद पवार यांनी योगी आदित्यनाथ यांचं नाव न घेता टीका केली. ( तालिबानी गोंधळात हरवलेल्या बाळाचा लागला शोध, पाच महिन्यांनी परतलं घरी ) ‘अयोध्या मंदिराचा निर्णय हा कोर्टानुसार झाला आहे. हा निर्णय सगळ्यांनी स्वीकारला. आता मथुरा,काशी यांचा उल्लेख केला जात आहे. हे वातावरण ढवळण्याचं, कलुषित करण्याचं काम केलं जात आहे. लोकांना हे समजतं, असंही पवार म्हणाले. ( Varanasi | बनारसला जायचे असेल तर ‘या’ दिवसातच भेट द्या, जाणून घ्या कारण ) आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत एकूण तीन राज्यांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभाग घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. उत्तरप्रदेशात भाजपचं सरकार हटवण्याची गरज आहे. उत्तरप्रदेशात परिवर्तन होणार असून नागरिकांना बदल हवाय. याकरिता सिराज मेहंदी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला आहे. येत्या दिवसात त्यांचे अनेक सहयोगी राष्ट्रवादीत येणार आहेत. असंही शरद पवार म्हणाले. ‘केंद्र आणि राज्य दोघांची चौकशी समिती रद्द केली आहे. सुप्रीम कोर्ट स्वतंत्र कमिटी चौकशीत तथ्य बाहेर येईल. पंतप्रधानांची सुरक्षा केंद्र आणि राज्य या दोघांची जबाबदारी असते. सुरक्षा मुद्दा हा अत्यंत संवेदनशील आणि गंभीर आहे. आता यावर आरोप प्रत्यारोप योग्य नाही, अशी प्रतिक्रियाही पवारांनी दिली. मुख्यमंत्री हेच महाराष्ट्राचे निर्णय घेतात, त्यांची प्रकृती ठीक नसल्यानं या चर्चा होतात. एसटी कर्मचारी अजूनही संपावर ठाम हा त्यांचा अधिकार आहे. पण मला असं वाटतं की, त्यांनी सरकार आणि कोर्टवर विश्वास ठेवावा, असं आवाहनही पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केलं, ( जान्हवी कपूरला 3 जानेवारीला झाली होती कोरोनाची लागण, समोर आली हेल्थ अपडेट ) मणिपूरमध्ये पाच जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक लढणार आहे. मणिपूर राज्यात काँग्रेससोबत बोलणी सुरू आहे. तसेच गोव्यातही काँग्रेस पक्षासोबत आणि तृणमूल काँग्रेस पक्षांसोबत चर्चा सुरू आहे. गोव्यात परिवर्तन करण्याची आवश्यकता आहे. भाजपचं गोव्यातून सरकार हटवण्याची गरज आहे. येत्या दोन दिवसांत आघाडीचा निर्णय होईल असंही शरद पवारांनी म्हटलं आहे. ‘पंजाबमध्ये काँग्रेसला परिस्थिती अनुकूल होती. मात्र,आता असं म्हणता येणार नाही. आता बदललेल्या परिस्थितीचा कसा फायदा भाजप उचलतो, ते बघावं लागेल, असं भाकितही पवारांनी वर्तवलं.