JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / सामना रंगणार...फडणवीसांच्या संकटमोचकाला घेरण्याची शिवसेनेची रणनीती

सामना रंगणार...फडणवीसांच्या संकटमोचकाला घेरण्याची शिवसेनेची रणनीती

देवेंद्र फडवणीस यांच्या कार्यकाळातील नवी मुंबईतील काही सिडको प्रकल्पावर ताशोरे ओढल्याच समजते यावरून वादळाचा शक्यता आहे.

जाहिरात

Nagpur: Former Maharashtra chief minister Devendra Fadnavis addresses a press conference during the fourth day of the winter session of Maharashtra State Assembly at Vidhan Bhawan, in Nagpur, Thursday, Dec. 19, 2019. (PTI Photo) (PTI12_19_2019_000157B)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 28 फेब्रुवारी : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप आणि शिवसेनेची जुगलबंदी बघायला मिळत आहेत. आजही सभागृहात भाजप आणि सेना आमने-सामने येण्याची शक्यता असून सामना रंगण्याची शक्यता आहे. आज अर्थसंकल्प अधिवेशनात प्रामुख्याने अवकाळी पाऊस आणि कर्जमाफी फायदा शेतकरी वर्गाला मिळाला नाही या मु्ददावर विरोधकांनी चर्चा मागितली आहे. राज्य शासनाच्या वतीने कर्जमाफी दिली असल्याचे सांगितले जात असले तरी त्यात त्रूटी आहे असा दावा विरोधकांनी केला असून या विषयावरच विधानसभा आणि विधान परिषदेत दीर्घकालीन चर्चा मागितली आहे. या मुद्दावरून विधीमंडळात गदारोळ होण्याचीही शक्यता आहे. त्याचबरोबर विधानसभा आणि विधान परिषद येथे आज पुरवण्या मागण्यांवर चर्चा सुरू होणार आहे, साधारण २४ हजार कोटी पुरवण्या मागण्या असून त्यावरून गदारोळ होण्याची शक्यता आहे, विधान परिषदेत जलसंपदा विभागाने गिरीश महाजन मंत्री असताना दिलेल्या निधीवरूनही आजचा दिवस गाजण्याची शक्यता आहे. काल कॅबिनेट बैठकीत कॅग अहवाल ठेवला, त्यात तत्कालीन मुख्यमंत्री विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस यांच्या कार्यकाळातील नवी मुंबईतील काही सिडको प्रकल्पावर ताशोरे ओढल्याच समजते यावरून ही कॅग अहवाल सभागृहात पटलावर ठेवण्याआधीच फोडल्याचा आरोप विरोधक सत्ताधारी नेत्यांवर करण्याची शक्यता आहे. विषारी ताडी तयार करणाऱ्यांवर क्राईम ब्रँचचा छापा, आरोपींना अटक अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज लक्षवेधी देखील महत्त्वाचा आहेत विधानसभेत नाशिक जवळ झालेल्या एसटी बस अपघातात मानवी चूक होती की तांत्रिक यावर लक्ष देते तसंच मुंबईतील SRA घरांना क्षेत्रफळ वाढवावा यावर देखील चर्चा आहे. एकूणच अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यातला आज कामकाजाचा शेवटचा  असून देखील विरोधक सत्ताधारी पक्षाची कोंडी करण्याच्या तयारीत आहे. दिल्लीतील हिंसाचावरून अमोल कोल्हेंनी साधला अमित शहांवर निशाणा ठाणे पालिकेच्या ‘या’ विभागाला लागू शकते आग, भाजप नगरसेवकाचा आरोप

खून, दरोडे आणि महिला अत्याचारानंतर आता नगर जिल्ह्यात फोफावले अवैध धंदे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या