JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / Uddhav Thackeray: मुंबईतील सभेनंतर उद्धव ठाकरे संपुर्ण महाराष्ट्रात सभा घेणार, शिवसेनेने आखला मेगा प्लान

Uddhav Thackeray: मुंबईतील सभेनंतर उद्धव ठाकरे संपुर्ण महाराष्ट्रात सभा घेणार, शिवसेनेने आखला मेगा प्लान

Uddhav Thackeray: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज मुंबईत जाहीर सभा घेणार आहेत. या सभेतून उद्धव ठाकरे विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर देणार आहेत.

जाहिरात

विरोधकांना प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेचा मेगा प्लान, उद्धव ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 मे : शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज जाहीर सभा होत आहे. या सभेत उद्धव ठाकरे विरोधकांवर आक्रमकपणे निशाणा साधणार असल्याचं बोललं जात आहे. मुंबईतील बीकेसी मैदानात सायंकाळी 7 वाजता ही सभा होणार आहे. मात्र, या सभेपूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईतील सभेनंतर उद्धव ठाकरे संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा (Uddhav Thackeray Maharashtra Tour) करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतल्या सभेनंतर संपुर्ण महाराष्ट्रात उद्धव ठाकरे जाणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संपुर्ण महाराष्ट्रात सभा घेणार आहेत. महाराष्ट्रात विभागवार सभा आखण्याचं काम सुरु करण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे महाराष्ट्रातल्या सर्व विभागात जाणार आहेत. शेतकरी, कष्टकरी आणि शिवसैनिकांची भेट उद्धव ठाकरे घेणार आहेत. वाचा :  “बुस्टर डोस कुणाचा माहिती नाही पण मास्टर ब्लास्टर डोस आमचाच असणार” भाजपसोबतची युती तुटल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करत राज्यात सत्ता स्थापन केली. तेव्हापासून भाजपकडून शिवसेनेवर वारंवर टीका करण्यात येत आहे. भाजप नेते शिवसेनेवर टीका करण्याची आणि शिवसेनेला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्याच दरम्यान गुढीपाडव्यापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही शिवसेनेवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर थेट निशाणा साधला. विरोधकांकडून सुरू असलेल्या या हल्ल्याला आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रत्युत्तर देणार आहे. वाचा :  “तुमच्यात ताकद असेल तर….” नवनीत राणांचं पुन्हा उद्धव ठाकरेंना आव्हान आजच्या सभेत उद्धव ठाकरे काय बोलणार? आजच्या या सभेत मुख्यमंत्री विरोधकांच्या सर्व टीकांना प्रत्युत्तर देणार आहेत. या सभेसाठी शिवसेनेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे शिवसेनेकडून या सभेचा आता तिसरा टिझर लाँच करण्यात आला आहे. या टीझरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील काही विधान आहेत. या विधानांमधून ते विरोधकांवर आक्रमकपणे निशाणा साधताना दिसत आहेत. उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा मुंबईतल्या बीकेसी मैदानात संध्याकाळी 7 वाजता पार पडणार आहे. उद्धव ठाकरेंची होणारी सभा अभूतपूर्व करण्यासाठी शिवसेनेची जय्यत तयारी झाली आहे. शिवसेनेच्या या जाहीर सभेत उद्धव ठाकरे अनेकांच्या तोंडावरचे मास्क उतरवणार असल्याचं खुद्द मुख्यमंत्र्यांनीच काही दिवसांपूर्वी जाहीर केलंय. त्यामुळे या आक्रमक सभेकडे सर्वांचंच लक्ष लागलंय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या