JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / 'स्वतःला विकलं तेवढं पुरे, मुंबईला विकू नका..' आदित्य ठाकरेंचा थेट मुख्यमंत्र्यांना हल्ला

'स्वतःला विकलं तेवढं पुरे, मुंबईला विकू नका..' आदित्य ठाकरेंचा थेट मुख्यमंत्र्यांना हल्ला

शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 जानेवारी : भाजप नेत्यांकडून मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार झाल्याचे आरोप वारंवार केले जात आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या आरोपींची चौकशी करण्याची देखील मागणी केली आहे. यावर आता शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत यावर पक्षाची भूमिका मांडली. सत्ताधाऱ्यांकडून मुंबईला लुटलं जात असल्याचा आरोप यावेळी ठाकरेंनी केला आहे. ज्या 400 किमीचे टेंडर जे तीन वर्षात काढायला हवे, ते एका वर्षात काढले असल्याचंही ते म्हणाले. आदित्य ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे गद्दार स्थानिक आमदार यांच्या बंदुकीतून गोळीबार झाला. पण, अद्याप कोणतीही कारवाई नाही. राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा नाही. राज्यपालांवर कारवाई नाही. मात्र, मुख्य विषयांना बगल देण्यासाठी हे असे विषय जाणूनबुजून जन्माला घालत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर केला आहे. ते पुढे म्हणाले की खोके सरकारने मुंबई महापालिकेची लूट सुरू केली आहे. 5 हजार रस्त्यांचं कोटींचं टेंडर ही धुळफेक आहे. 450 किमी 6084 कोटींचं टेंडर आहे, फेब्रुवारीत काम सुरु केलं तरी काम कधी होणार? रस्त्याखाली 42 युटीलिटी,16 एजन्सी काम करतात. वाहतूक पोलीस परवानगी आवश्यक. बीएमसीचा पैसा दुसऱ्या कमिटीला देऊ शकतात काय? 400 किमी रस्ते शक्यच नाही, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला. ठेकेदार बीडच्या कमीनं जायचे. मात्र, रिस्पॉन्स आला नाही असं दाखवून शेड्युल ब्रेक दाखवून किंमत 20 टक्क्यानी वाढवली. 20 टक्के खाली बीड करणाऱ्या ठेकेदारांना 20 टक्के वर दिले. यात 40 टक्क्यांचा घोटाळा आहे. जीएसटी स्वतंत्र लागू केला जो आधी इन्कल्यूड असायचा. सरासरी 48 टक्के ठेकेदाराला फायदा होत असल्याचे दिसत असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला आहे. वाचा - ‘सत्यजित तांबे यांचं काम चांगलं पण..’ आरोपांवर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया खोके सरकार लूट करतंय : ठाकरे बीएमसीमध्ये जनरल बॉडी नसताना प्रशासकाला कोणी दिला? खोके सरकार लूट करतं आहे. मुख्यमंत्र्यांनी काय स्पेशल CM कडून आदेश घेतलाय का? कोणतीही NOC नसताना टेंडर काढलं गेलं आहे. मुंबईतील सर्व रस्ते 2 वर्षात खड्डेमुक्त होईल, असं मुख्यमंत्री यांना वाटतं. मग ठाण्यातले का नाही केलेत? हा मुंबईला लुटण्याचा डाव आहे. या कामांचे मुंबईत 5 झोन आहेत. 5 कंपन्यानी एक एक पॅकेट घेतलंय. हे ठरवून केलंय काय? ठेकेदार 5 कंपन्यानी रिंग केली आहे, हे मुंबईसाठी घातक असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.

माझी मुंबई विकू नका, स्वतःला विकलं तेवढं पुरे : आदित्य ठाकरे माझा घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना प्रश्न आहे. मार्च 2022 च्या 2 हजार कोटींच्या कामाला 3 वर्ष लागणार हे त्यांनी हाऊस मध्ये सांगितलं. मग या 6 हजार कोटींच्या कामाला किती वर्ष लागणार? हे टेंडर स्क्रॅप करून रिकॉल करा ही आमची मागणी आहे. महालक्ष्मी रेसकोर्स मुद्द्यावर कागदपत्रांसहित लवकरच बोलणार आहे. हे आता बिल्डर, कॉन्टॅक्टर सरकार झालं आहे. माझी मुंबई विकू नका, स्वतःला विकलं तेव्हढं पुरे, माझ्या मुंबईचं ATM करू नका हे माझं मुख्यमंत्र्यांना आवाहन असल्याचं ठाकरे म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या