JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / Mumbai Rain: मुंबईत जुलैमधील पावसाचा नवा रेकॉर्ड; आजही रेड अलर्ट, शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

Mumbai Rain: मुंबईत जुलैमधील पावसाचा नवा रेकॉर्ड; आजही रेड अलर्ट, शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

आजही मुंबईत पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा तसंच सर्व महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली आहे.

जाहिरात

मुंबईत आजही मुसळधार

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 27 जुलै : गुरुवारच्या मुंबईतील काही भागांमध्ये आयएमडीने रेड अलर्ट घोषित केला आहे. त्यानंतर बीएमसीने शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. मुंबईत बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाने जुलै 2020 मध्ये सेट केलेल्या 1,502.6 मिमीचा रेकॉर्ड ओलांडला आहे. पावसाने एकूण 1,512.7 मिमीपर्यंत पोहोचून जुलै महिन्यातील पावसाचा नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. या पावासने जुलै 2005 मध्ये, मुंबईत एकाच दिवसात 944 मिमी पाऊस पडलेल्या त्या पावसाची आठवण करून दिली. यावेळी एकूण मासिक पाऊस 1454.4 मिमी होता. या महिन्यात नोंदवलेल्या पावसापेक्षा तो 58 मिमी कमी होता. 25 जून रोजी मान्सून सुरू झाल्याची घोषणा झाल्यापासून एका महिन्याच्या आत मुंबईने 2,000 मिमीचा टप्पा ओलांडला आहे. यापूर्वी, IMD च्या सांताक्रूझ वेधशाळेने 52 दिवसांत (22 जुलै 2021 रोजी) हा टप्पा गाठला होता. मुंबईची वार्षिक सरासरी 2,318 मिमी आहे. Weather Update : मुंबईकरांनो! पोहता येत असेल तरच आज घराबाहेर पडा, हवामान विभागाचा अनोखा इशारा कुलाबा आणि सांताक्रूझ येथील IMD च्या वेधशाळांमध्ये 124.8 मिमी आणि 124 मिमी पावसाची नोंद झाली. रात्री 8.30 वाजता संपलेल्या 12 तासांत तिहेरी अंकी पावसाची नोंद झाली आहे. उल्लेखनीय म्हणजे, शहराने 21 जुलै रोजी पहिला 1,000 मिमी पावसाचा टप्पा गाठला आणि त्यानंतरचा 1,000 मिमीचा टप्पा पाच दिवसांत गाठला. आजही मुंबईत पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. IMD ने आधी मुंबईत ऑरेंज अलर्ट जारी केला होता. मात्र नंतर अपडेट देत रेड अलर्ट जारी करण्यात आला. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी मुंबई महानगरातील महानगरपालिकेच्या तसंच सर्व शासकीय आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा तसंच सर्व महाविद्यालयांना आज गुरुवार दिनांक 27 जुलै 2023 रोजी सुट्टी जाहीर केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या