सोमय्या यांच्या कार्यालयातीलच दोघांनी संगनमत करून श्रवणयंत्र मशिनमधील वाटपात 7 लाखांचा घोटाळा केल्याचं उघड
मुंबई, 04 मार्च : महाविकास आघाडी सरकारचे घोटाळे उघड करणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या कार्यालयातच घोटाळा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमय्यांच्या कार्यालयातील दोन जणांनी 7 लाखांचा घोटाळा केला आहे. या प्रकरणी मुलुंड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या हे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे घोटाळे काढण्याचे एक्स्पर्ट मानले जातात. त्यांनी आजपर्यंत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबापासून ते आमदार आणि मंत्र्यांवरही अनेक गंभीर आरोप केले. या आरोपांमुळे काही जणांना जेलची हवाही खावी लागली. परंतु, सोमय्यांच्या कार्यालयात घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. (‘निवडणूक आयोग भोस..’ संजय राऊत निवडणूक आयोगावर घसरले; म्हणाले 50 वर्षांपूर्वी..) सोमय्या यांच्या कार्यालयातीलच दोघांनी संगनमत करून श्रवणयंत्र मशिनमधील वाटपात 7 लाखांचा घोटाळा केल्याचं उघड झालं आहे. याप्रकरणी सोमय्या यांच्या मुलुंडमधील कार्यालयात काम करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रज्ञा गायकवाड आणि श्रीकांत गावित अशी दोन आरोपींची नावं आहेत. (‘चारित्र्यहीन व्यक्ती राजकारणातली व्हिलन’, पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना सणसणीत टोला) या दोघांनी संगनमत करून 7 लाखांचे श्रवणयंत्र मशीन वाटपात घोळ केला. अखेरीस हा प्रकार उघड झाल्यानंतर या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. काय आहे प्रकरण? 2017-18 मध्ये किरीट सोमय्या हे अध्यक्ष असलेल्या युवक प्रतिष्ठान मार्फत मुंबईमध्ये ‘ऐका स्वाभिमानाने’ या उपक्रमाअंतर्गत श्रवन मशीन यंत्र प्रति मशीन 500 रुपये दराने ज्येष्ठ नागरिकांना दिले होते. दर शनिवारी सोमय्यांच्या कार्यालयामध्ये या श्रवण यंत्राचे वाटप केले जात होते. या कामासाठी प्रज्ञा गायकवाड, श्रीकांत गावीत यांची नेमणूक केली होती. अनेक ठिकाणी श्रवण यंत्राचे वाटप झाले होते. याबद्दल दोघांकडे हिशेब मागितला असता तपशील समोर येऊ शकली नाही. त्यानंतर अभिलेखाकडून याची चौकशी करण्यात आली असता 2022 ते फेब्रुवारी 2023 मध्ये एकूण 6488 मशीन पैकी 5094 श्रवण यंत्राचे वाटप करण्यात आले नाही. या मशीनची किंमत ही 7 लाख 36 हजार इतकी आहे. दोघांनीही गैरव्यवहार केल्याचे मान्य केलं आहे. या प्रकरणी अखेर दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.