मुंबई 27 जून : संजय राऊत यांना ईडीने समन्स (Sanjay Raut summoned by ED) बजावलं आहे. 28 जूनला चौकशीसाठी हजर राहाण्याचे आदेश ईडीने दिले आहेत. प्रवीण राऊत आणि पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना ईडीने समन्स बजावले आहे. यावर आता संजय राऊत यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे (Sanjay Raut Reaction on ED Summons). BREAKING : बंडखोरी भोवली, एकनाथ शिंदेंसह बंडखोरांची खाती मुख्यमंत्र्यांनी काढली, मंत्रिमंडळात नवे खातेवाटप संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं, ‘मला आताचं समजलं ED ने मला समन्स पाठवलं आहे. छान. महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोत. मला रोखण्यासाठी हे कारस्थान सुरू आहे. माझी मान कापली तरी मी गुवाहाटीचा मार्ग स्विकारणार नाही. या, मला अटक करा! जय महाराष्ट्र!’
संजय राऊत यांना उद्या म्हणजेच मंगळवारी सकाळी 11 वाजता हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणी ईडीने याआधी संजय राऊत यांचा अलिबागमधील प्लॉट आणि दादरमधील फ्लॅट जप्त केला होता. ईडीने राऊत यांच्याशिवाय त्यांच्या पत्नीचीही चौकशी केली आहे. BREAKING : सत्तासंघर्षादरम्यान संजय राऊतांना आणखी एक धक्का; ईडीचं समन्स, चौकशीसाठी बोलावलं यापूर्वी, या प्रकरणात आतापर्यंत 11.15 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यातील 9 कोटींची मालमत्ता प्रवीण राऊत यांची आहे, तर 2 कोटींची मालमत्ता संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या मालकीची आहे. ईडीच्या कारवाईवर संजय राऊत म्हणाले की, संपत्ती जप्त झाली किंवा गोळ्या झाडल्या तरी या प्रकरणाला मी घाबरत नाही. राऊत यांनी ईडीची ही कारवाई सूडाची कारवाई असल्याचं म्हटलं होतं.