भक्तांची फौज, त्यात पुन्हा अंधभक्तांचा प्रखर उपगट आहे, तर दुसऱ्या बाजूला इतरांचे चमचे महामंडळ. हे दोघेही देशासाठी खतरनाक आहेत.
मुंबई, 12 जानेवारी : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका (Assembly Election 2022) जाहीर झाल्या असल्या तरी त्यामुळे महाराष्ट्रातीलही राजकीय वातावरण चांगलेच तापले असल्याचं दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपच्या पराभवाचं भाकित वर्तवले आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना खोचक सवाल केला की, ‘शरद पवार पंतप्रधान कधी होतील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर कधी पडतील, याची भविष्यवाणी पवारसाहेबांनी करावी’. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलेल्या या विधानावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. (Sanjay Raut replied ot Chandrakant Patil over his statement on CM Uddhav Thackeray and Sharad Pawar) संजय राऊत म्हणाले, त्यांना योग्य वेळी आम्ही माहिती देऊ. मुख्यमंत्र्यांचं काम अतिशय उत्तम पद्धतीने सुरू आहे. 13 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या बैठकीत मुख्यमंत्री सहभागी होतील. हे आपण स्वत: पाहालच. शरद पवार यांच्या इतकी राजकारणाची, समाजकारणाची आणि व्यक्तीमत्वाची उंची गाठावी. तुमच्यासारख्या टेकड्यांना सह्याद्री किंवा हिमालचाच्या उंचीसोबत स्पर्धा करता येणार नाही. पंतप्रधान पदावर एखादा व्यक्ती बसला म्हणून ती अनेकदा मोठी होते असं नाही. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री यांची उंची मोठीच होती. अनेकदा अनेक व्यक्ती त्या पदापर्यंत पोहोचू शकल्या नाहीत तरी त्यांची उंची कमी झाली नाही. काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील? उत्तर प्रदेश आणि गोव्यात भाजपचा पराभव होणार असे भाकित शरद पवारांनी केले. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत म्हटलं, ज्योतिष्य, कर्मकांड नाकारणारे शरद पवार आणि प्रबोधनकारांचा वारसा सांगणाऱ्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत भविष्यवेत्ते कधी झाले? उत्तर प्रदेश, गोव्यात सत्ता परिवर्तनाबाबत दावे समजू शकतो, पण छातीठोक भविष्यवाणी हे मनोरंजन आहे. तसंच, या दोन्ही महापुरुषांना खरोखरच ज्योतिष्य अवगत असेल, तर त्यांनी गोवा, उत्तर प्रदेशाबद्दल बोलण्यापेक्षा महाराष्ट्राबाबत भविष्य सांगावं. राऊत यांनी सांगावं की, शरद पवार पंतप्रधान कधी होतील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर कधी पडतील, याची भविष्यवाणी पवारसाहेबांनी करावी’ असा टोला पाटील यांनी लागवला. फडणवीस गोव्यात गेल्यावर भारतीय जनता पक्षही फुटला शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले, “देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातून गोव्यात गेले आहेत. आणि आपण पाहिलं असेल की, देवेंद्र फडणवीस गोव्यात गेल्यावर भारतीय जनता पक्षही फुटला. काल एक मंत्री मायकल लोबो यांनी पक्षाचा त्याग केला. प्रविण झाल्टे यांनीही पक्ष सोडला. त्यामुळे त्यांनी आधी पक्षांतर्गत जे काही युद्ध सुरू आहे ती लढाई लढावी.” महाराष्ट्रातून गोव्यात नोटांच्या बॅगा चालल्या… संजय राऊत पुढे म्हणाले, आची लढाई गोव्यात खरोखर नोटांशीच आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते ज्या प्रकारे तिकडे नोटांचा पाऊस पाडत आहेत विशेष करुन महाराष्ट्रातून ज्या काही नोटांच्या बॅगा चालल्या आहेत त्यामुळे शिवसेनेसारखा पक्ष त्या नोटांशी नक्की लढेल आणि गोव्याच्या जनतेला सांगण्याचा प्रयत्न करेल की या नोटांच्या दबावाखाली येऊ नका.